Tuesday, October 1, 2024

Latest Posts

Navratri 2024 : भारतामधील प्रसिद्ध अंबा मातेचे मंदिर कुठे आहेत बरं? घ्या जाणून…

देशभरामध्ये अंबा मातेची असंख्य मंदिरे आहेत. जी देवीमातेच्या भक्तांमध्ये लोकप्रिय आहे. त्या लोकप्रिय मंदिरापैकी असे एक शक्तीपीठ आहे जेथे देवीची मूर्ती नसूनही लाखोच्या संख्येने भक्तांना देवीचे दर्शन होते. माउंट अंबू पासून ४५ किमी अंतरावर अंबा मातेचे प्राचीन शक्तीपीठ आहे. हे अंबा मातेचे मंदिर गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर आहे. हिंदू धर्मामध्ये या मंदिराला विशेष स्थान आहे. सुखी वैवाहिक जीवनासाठी नवविवाहत जोडपे अंबा मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात. मंदिरामध्ये देवीच्या तसेच तिच्या रथाच्या पावलांचे ठसे आहेत. त्यात भवानीची मूर्ती नाही, पण तिथे श्रीयंत्र बसवलेले आहे. देवीच्या भक्तांना त्यामध्ये आईची मूर्ती पाहता येईल अश्या पद्धतीने सजावट करण्यात आली आहे.

अंबा मातेच्या मंदिराचे बांधकाम १९७५ मध्ये सुरु झाला, जो आजून ही चालू आहे. हे भव्य मंदिर पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बनवलेले पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. याचे शिखर १०३ फूट उंच असून त्यावर ३५८ सोन्याचे कलश आहेत. मंदिरापासून सुमारे ३ किमी अंतरावर गब्बर नावाचा डोंगरही आहे, त्या ठिकाणी आणखी एक देवीची प्राचीन मंदिर आहे. ह्या दगडावरती अंबा मातेच्या पावलांचे ठसे आणि सारथ्याचे ठसे असल्याचे मानले जाते. देवी अंबाबाईच्या दर्शना नंतर भाविक गब्बर हिलवर वसलेल्या या मंदिराला दर्शनासाठी जातात. दरवर्षी भाद्रपदी मध्ये पौर्णिमेला तिथे जत्रा भरते. नवरात्रीमध्ये मंदिरात गरबा, भवाई या पारंपरिक नृत्यांचे आयोजन देखील केले जाते.

मंदिरामध्ये देवीची मूर्ती नाही – देशामधील सर्वात जुन्या ५१ शक्तिपीठांपैकी शक्तीस्वरूपा हे अंबाजी मंदिर आहे. जिथे माता सतीचे हृदय पडले होते. मंदिरामध्ये जाण्यासाठी एकूण ९९९ पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते. या मंदिरामध्ये अंबा मातेची मूर्ती नसल्या मुळे श्रीयंत्राद्वारे पूजा केली जाते. नवरात्र हा एक खास सण आहे जो नऊ दिवस उत्सवात साजरा कला जातो. ज्यामध्ये देवीची मनोभावाने पूजा करून गरबा खेळला जातो.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे: Aaditya Thackeray

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss