Navratri Fasting २०२४: नवरात्रीमध्ये वजन कमी करण्यासाठी ‘या’ ५ टिप्सला फॉलो करा

Navratri Fasting २०२४: नवरात्रीमध्ये वजन कमी करण्यासाठी ‘या’ ५ टिप्सला फॉलो करा

नवरात्रीला आता सुरुवात होणार आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची मनोभावेनी पूजा केली जाते. देवीचे भक्त हा नऊ दिवसाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात आणि नऊ दिवस दुर्गा मातेचा उपवास देखील करतात. उपवास करण्यामागची वैज्ञानिक कारण म्हणजे नियमित अन्न खाण्यापासून विश्रांती घेऊन आपले शरीर शुद्ध आणि डिटॉक्स करणे. नवरात्रीच्या उपवसामध्ये ग्लूटेनमुक्त धान्य आणि हलके पदार्थ खाण्यास प्रोत्साहन मिळते. पण उपवासादरम्यान आपण आहारामध्ये नेमके काय घेतले पाहिजे हे सविस्तर पाहूया.

उपवासादरम्यान आहारात भाज्या घ्या

नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये धान्य खाल्ले जात नाही. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही तळलेले बटाटे आणि पुरी खात राहा. पण अश्या स्थितीत शरीराला आवश्यक पोषक द्रव्य पुरवण्यासाठी तुम्ही भाज्यांचे सेवन करू शकतात. हे शरीराला पोषण देईल आणि वजन कमी करण्यासाठी मदत करू शकते. तुम्ही घरी सूप आणि सलाडदेखील बनवू शकता.

फळे कमी प्रमाणात खात रहा

तुम्ही जर दिवसभर स्वतःला उपाशी ठेवले तर तुमच्या शरीरातील रक्तामधील ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते आणि तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे वजन नियंत्रण ठेवण्यासाठी उपवासादरम्यान एका वेळेला जास्त अन्न खाण्याऐवजी कमी प्रमाणात अन्न खाणे सुरू ठेवा.

उपवासामध्ये शरीर हायड्रेट ठेवा

उपवासामध्ये तुम्ही सतत पाणी पीत जा. ज्यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहील. वेळोवेळी पाणी पिणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमची भूक कमी होईल आणि तुमचे शरीर हायड्रेट राहील. उपवास असताना पाणी जर तुम्ही वेळोवेळी पिले नाही तर तुमच्या शरीरामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येऊ शकतो. त्यामुळे उपवास असताना तुम्ही नारळ पाणी, किंवा भाज्यांचा रस पिऊ शकतात.

घरातील चांगले पदार्थ खा

उपवासामध्ये पॅक बंद पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलले हेल्दी पदार्थ खा, मखाना, शेंगदाणे, काजू असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. तुम्ही एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी कमी प्रमाणात खा. त्यामुळे तुमचे वजन कमी होईल आणि पुरेशी प्रमाणात तुम्हाला ऊर्जा मिळत राहील.

Exit mobile version