spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

New Year 2023 यंदाच्या वर्षी १२ न्हवे तर चक्क १३ महिन्यांचं असणार हिंदू कॅलेंडर!

नवं वर्ष सुरू होण्यास आता बोटावर मोजण्याइतकेच दिवस उरले आहेत . नववर्ष २०२३ सुरु होणार असून कोणता सण कधी याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे हिंदू पंचांगानुसार, पुढचं वर्ष १२ ऐवजी १३ महिन्यांचा असणार आहे. म्हणजेच २०२३ या वर्षात अधिक महिना असणार आहे.

New Year 2023 : नवं वर्ष सुरू होण्यास आता बोटावर मोजण्याइतकेच दिवस उरले आहेत . नववर्ष २०२३ सुरु होणार असून कोणता सण कधी याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे हिंदू पंचांगानुसार, पुढचं वर्ष १२ ऐवजी १३ महिन्यांचा असणार आहे. म्हणजेच २०२३ या वर्षात अधिक महिना असणार आहे. श्रावण महिना ३० ऐवजी ६० दिवसांचा असणार आहे. यामुळे चातुर्मास ४ महिन्यांऐवजी ५ महिन्यांचा असेल. हिंदू वर्षानुसार तिथी कमी अधिक असल्याने ११ दिवस घटतात. तसेच ३ वर्षात ही संघ्या ३० ते ३३ होते. तेव्हा कमी झालेले दिवस एडजस्ट करण्यासाठी अधिक मास येते. ३ वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला पुरुषोत्तम मास बोललं जातं. २०२३ या वर्षात पुरुषोत्तम मास १८ जुलै २०२३ ते १६ ऑगस्ट २०२३ पर्यंत असणार आहे. त्यानंतर श्रावण महिना १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. अधिक मासामुळे हे घडणार असून याला मलमास असेही म्हणतात. अधिकमासामुळे तब्बल १९ वर्षानंतर असा दुर्मिळ योग जुळून आला आहे.

कधीपासून कधी पर्यंत असेल अधिक मास?

२०२३ मध्ये अधिकमास १८ जुलैपासून सुरू होईल तर १६ ऑगस्ट २०२३ पर्यंत असेल. या महिन्याला भगवान विष्णूच्या भक्तीचा महिना म्हटलं जातं. हा महिना श्रावण महिन्यातच सुरू होणार असल्याने महादेवाची भक्ती करणाऱ्यांना अधिक वेळ मिळणार आहे.

अधिक मास का लागतो?

सूर्य वर्ष ३६५ दिवस आणि ६ तासांचं असतं. तर चंद्र वर्षे ३५४ दिवसांचं असतं. सूर्य वर्ष आणि चंद्रवर्षात ११ दिवसांचं अंतर असतं. हे अंतर कमी करण्यासाठी प्रत्येक ३ वर्षांनी एक अधिक मास असतो. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक तीन वर्षात एक अधिक मास असतो.

काय असते मलमास?

हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक तीन वर्षांनी एक अतिरिक्त महिना जुळून येतो ज्याला अधिकमास किंवा मलमास किंवा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. सूर्य वर्ष ६५ दिवस आणि ६ तास असते. तर चंद्र वर्ष ३५४ दिवसांचं मानल्या जातं. दोन्ही वर्षांमध्ये जवळपास 11 दिवसांचा फरक आहे. प्रत्येक वर्षी कमी होणाऱ्या या ११ दिवसांना जोडल्यास एक महिना होतो. याच अंतराला सुरळीत करण्यासाठी दर तीन वर्षांनी चंद्र मास अस्तित्वात येते. ज्याला अधिकमास असं म्हणतात.

अधिकमासात चुकूनही करू नका या चुका

अधिक मासात लग्न करणं अशुभ मानल्या जातं. या काळात लग्न केल्यास ना तुम्हाला भौतिक सुख मिळणार ना तुम्हाला शारीरिक सुख मिळणार. पती पत्नीत भांडणं होतील.

अधिकमासात नवा व्यवसाय सुरू करू नका. मलमासात नवा व्यवसाय सुरू केल्यास तुम्हाला अनेक आर्थिक अडचणी येतील.

अधिकमासात नव्या इमारतीचं बांधकाम करू नये. या काळात बनवलेल्या घरांत सुख शांतीचा भंग होतो.

कुठलेही मंगल कार्य जसे की कर्णवेध, मुंडन अशुभ मानल्या जातं. या काळात इमारतीचे किंवा कुठलेही काम केल्यास नात्यातला गोडवा कमी होतो.

हे ही वाचा :

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

New Year 2023 नवीन वर्षाचे स्वागत करताय ? तर ‘या’ आरोग्याच्या टिप्स करा फॉलो

 

Latest Posts

Don't Miss