भाद्रपद महिन्यातील तृतियेला पार्वतीचा केला पत्नी म्हणून स्विकार, जाणून घ्या हरतालिकाची कथा

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका" असे म्हणतात. यंदा दि. ३० ऑगस्ट रोजी हरतालिकेचे पुजन होणार आहे.

भाद्रपद महिन्यातील तृतियेला पार्वतीचा केला पत्नी म्हणून स्विकार, जाणून घ्या हरतालिकाची कथा

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका” असे म्हणतात. यंदा दि. ३० ऑगस्ट रोजी हरतालिकेचे पुजन होणार आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुषीसाठी तर कुमारिका चांगला वर मिळावा यासाठी हरतालिकेची पूजा करतात. तसेच हे व्रत भगवान शंकराची आराधना करण्यासाठी ही केले जाते. कारण देवी पार्वतीने भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते.

हरतालिका व्रत कथा –

हे व्रत एका चांगल्या पतीच्या इच्छेने आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. या उपवासाचे महत्त्व शिवाने पार्वतीला तपशीलवार समजावून सांगितले. माता गौरी हिने सती नंतर हिमालयात पार्वती म्हणून जन्म घेतला. लहानपणापासूनच पार्वतीला भगवान शिव हे वर म्हणून हवे होते. ज्यासाठी पार्वतीजींनी कठोर तपस्या केली, थंडीत पाण्यात उभे राहून, उष्णतेमध्ये यज्ञासमोर बसून यज्ञ केले. पावसात पाण्यात राहून तीव्र तप केले. पर्वतराजाची मुलगी पार्वती ज्यावेळी लग्ना योग्य झाली त्यावेळी तिच्याकरता वर पाहाणे सुरू झाले. नारदमुनींनी पर्वतराजाला पार्वतीकरीता भगवान विष्णुंचे स्थळ सुचवले. पण या गोष्टीची पार्वतीला काहीच माहिती नव्हती तीने आपल्या मनात फार पुर्वीच भगवान शंकरांना आपला वर मानले होते. ज्यावेळेस पार्वतीला आपले वडिल आपला विवाह भगवान विष्णुंशी निश्चित करतायेत असे समजते त्यावेळेस तिला फार वाईट वाटते आणि आपल्या मैत्रींणींच्या हातुन ती आपल्या वडिलांना निरोप पाठवते की “जर बळजबरीने तुम्ही माझा विवाह भगवान विष्णुंशी लावुन दिलात तर मी माझ्या जिवाचे बरे वाईट करेल ’’. निरोप पाठवल्यानंतर देवी पार्वती वनात निघुन गेली आणि भगवान शिव प्रसन्न व्हावेत व आपला पत्नी म्हणुन स्विकार करावा याकरीता व्रत आरंभिले. तीने अत्यंत मनोभावे भगवान शिवाची पुजा केली आणि कडक उपवास देखील केला. तीची भक्ती आणि श्रध्दा पाहुन महादेव प्रसन्न झाले आणि तीची विनंती मान्य करून पार्वतीचा आपली पत्नी म्हणुन स्विकार केला. त्या दिवशी भाद्रपद महिन्यातील तृतिया होती त्यामुळे आजही प्रत्येक सवाष्ण स्त्री हरतालिकेच्या दिवशी देवी पार्वतीने केलेले व्रत मोठया निष्ठेने आचरतात, यथासांग पुजन करतात, उपवास करतात.

हे ही वाचा :-  जाणून घ्या… हरतालिका उपवासाचे महत्व 

हरतालिका पूजेची सामग्री –

पांढरे फुलं, केळीचे पान, सर्व प्रकारची फळे आणि फुले, बेल पत्र, शमी पत्र, आंब्याची पानं,, श्रीफळ आणि दातुराची फुले, एकवान फूल, तुळशी, नाडा, कपडे, माता गौरीसाठी पूर्ण सौभाग्याचं सामान ज्यामध्ये बांगड्या, मेण, काजळ, बिंदी, कुंकु, सिंदूर, कंगवा, माहूर, मेहंदी इत्यादी विश्वासानुसार गोळा केल्या जातात.हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, तूप, तेल, दिवा, कापूर, अबीर, चंदन, कलश. पंचामृत – तूप, दही, साखर, दूध, मध.

हे ही वाचा:

यंदा बाप्पाच्या दर्शनासाठी काही खास आमंत्रण पत्रिका

गणेश चतुर्थी 2022: गणपतीला आवडणारे 5 पदार्थ

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version