spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Pitru Paksha 2022 : पितृपक्षात सोनं खरेदी करायचं ? पण करावे कि नाही ?

पितृपक्षामध्ये शुभ कार्य करण्यास अनेक ठिकाणी मनाई असते. नवीन कपडे घालणं, नव्या वस्तू खरेदी करणे इत्यादी गोष्टी देखील पितृपक्षात करू दिल्या जात नाहीत, असे मानले जाते.

पितृपक्षामध्ये शुभ कार्य करण्यास अनेक ठिकाणी मनाई असते. नवीन कपडे घालणं, नव्या वस्तू खरेदी करणे इत्यादी गोष्टी देखील पितृपक्षात करू दिल्या जात नाहीत, असे मानले जाते. मात्र, पितृ पक्षाच्या या १५ दिवसांमध्ये अष्टमी हा दिवस शुभ मानला जातो. पितृपक्षामध्ये येणाऱ्या अष्टमीला देवी लक्ष्मीचे वरदान प्राप्त आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी सोनं खरेदी केल्याने त्यात आठ पटीने वृद्धी होते असे मानले गेले आहे. सोबतच इतर खरेदीसाठी देखील हा दिवस शुभ असल्याचे म्हटलं जातं. लग्नाच्या खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी हत्तीवर विराजमान लक्ष्मीची पूजा करणे लाभदायक ठरते.

या दिवशी हत्तीवर स्वार महालक्ष्मीची पूजा केली जाते. संध्याकाळी स्नान करून देवघरात एका चौरंगावर लाल कपडा पसरवून त्यावर केशर-चंदनाने अष्टदळ तयार करून त्यावर अक्षता ठेवून जल कलश ठेवतात. कळशाजवळ हळदीने कमळ तयार करून त्यावर लक्ष्मीची मूर्ती प्रतिष्ठित करतात. मातीच्या हत्तीला स्वर्णाभूषण घालून सजवतात. चांदी किंवा सोन्याचा हत्ती देखील ठेवता येतो.

हे ही वाचा : Pitru paksha 2022 : आजपासून सुरु होणाऱ्या पितृपाक्षाविषयी शंका आहेत ? तर मग करा शंकाचे निरसन…

तसेच श्राद्ध पक्षात पूर्वज पृथ्वीवर त्यांच्या कुटुंबात येतात आणि त्यांना सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात. प्राचीन काळापासून पितृ पक्ष हा जग आणि परलोक यांच्यात समतोल साधण्याचा काळ म्हणून ओळखला जात होता. पितृ पक्षात तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू केले किंवा खरेदी केली तर पूर्वजांना त्याचा राग येत नाही आणि कोणत्याही गोष्टीत अशुभ किंवा प्रेतवादाचा भाग नसतो. उलट, त्यांना आनंद होतो की त्याचे कुटुंब प्रगती करत आहे. अडचण तेव्हाच येते जेव्हा एखादी व्यक्ती या पूर्वजांकडे लक्ष देणे आणि त्यांचा आदर करणे सोडून तिरस्कार करतात. कुठलिही खरेदी केल्यानंतर पूर्वजांचे आभार नक्की माना.

पितृ पंधरवड्यात पितरांसाठी केले जाणारे सर्व विधी उजव्या खांद्यावर जानवं परिधान करून, तसंच दक्षिणेकडं (South) तोंड करून केले जातात. तर्पण विधीत काळे तीळमिश्रित (Black Sesame) पाणी पितरांचं स्मरण करून त्यांना अर्पण केलं जातं. श्राद्ध विधीत पितरांना अन्नदान करताना पंचबली काढले जातात. पंचबली म्हणजे गाय, कुत्रा, कावळा, देवता आणि चिमणीसाठी त्यातून अन्न वेगळं काढलं जातं. अशा पद्धतीनं भोजन आणि जल अर्पण केल्यानं पितरांना शांती लाभते. श्राद्धविधीसाठी दूध, तांदूळ, साखर आणि तुपापासून पदार्थ बनवले जातात. कुशाच्या आसनावर बसून पंचबलींसाठी भोजन ठेवावं. त्यानंतर पितरांचं स्मरण करून खालील मंत्र तीन वेळा म्हणावा,

ओम देवताभ्यः पितृभ्यश्र्च महायोगिभ्य एवच नमः
स्वधायै स्वाहायै नित्य में भवन्तु ते!

यानंतर आग्नेय काव्यवाहनाय स्वाहा, सोमाय पितृ भते स्वाहा, वैवस्वताय स्वाहा असं म्हणून तीन वेळा आहुती द्यावी. हे करणं शक्य नसेल तर पाण्याच्या भांड्यात काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला तोंड करून तर्पण करावं आणि ब्राह्मणाला फळ-मिठाई आणि दक्षिणा द्यावी.

 

हे ही वाचा :

Pitrupaksh shradh 2022 :- जाणून घ्या… श्राद्धाचे अनेक प्रकार

Pitru Paksh 2022 : पितृपक्षात श्राद्ध का करावे, श्राद्ध करण्याची पद्धत काय ?… पितृपक्षाबद्दल सर्व माहिती घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss