New Year 2023 च्या सेलिब्रेशनसाठी परदेशात जाण्याचा प्लॅन करताय? तर चुकूनही जाऊ नका ‘या’ देशांमध्ये

जगातील अनेक देश पुन्हा कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहे. त्यामुळे हे देश त्यांच्या लोकसंख्येमध्ये संसर्ग वाढू नये म्हणून नवीन वर्षात प्रवासी निर्बंध लादण्याची अपेक्षा आहे.

New Year 2023 च्या सेलिब्रेशनसाठी परदेशात जाण्याचा प्लॅन करताय? तर चुकूनही जाऊ नका ‘या’ देशांमध्ये

जागतिक स्तरावर कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी परदेशात जाण्याचे नियोजन करताना प्रवाशांनी किमान सात देश टाळले पाहिजेत. जगातील अनेक देश पुन्हा कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहे. त्यामुळे हे देश त्यांच्या लोकसंख्येमध्ये संसर्ग वाढू नये म्हणून नवीन वर्षात प्रवासी निर्बंध लादण्याची अपेक्षा आहे.

चीन:

परदेशी प्रवास टाळताना चीन या यादीत अव्वल स्थानावर आहे कारण देशात विक्रमी संसर्गाची नोंद होत आहे. डिसेंबरच्या पहिल्या २० दिवसांत सुमारे २५० दशलक्ष लोकांना (लोकसंख्येच्या १८ टक्के) कोविड-१९ ची लागण झाली होती, असा अंदाज चिनी अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे, कारण बीजिंगने जवळजवळ तीन वर्षांपासून या आजारावर असलेले निर्बंध अचानक काढून टाकले. भारतासह विविध देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू केली आहे.

जपान:

जपान सध्या दररोज २ लाखांहून अधिक नवीन कोविड प्रकरणे नोंदवत आहे आणि त्यामुळे हा देश तुमच्या प्रवासाच्या यादीत नसावा. जपानच्या आरोग्य अधिकार्‍यांनी नोंदवले की देशात एकाच दिवसात कोविड विषाणूमुळे ३७१ मृत्यू झाले आहेत, २०२० मध्ये साथीचा रोग सुरू झाल्यापासून एका दिवसातील ही सर्वाधिक मृत्यूंची संख्या आहे. सध्या जपान साथीच्या आठव्या लाटेचा सामना करत आहे.

अमेरिका:

अमेरिकादेखील कोविडच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ नोंदवत आहे कारण गेल्या २८ दिवसांत देशात १५ लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. २१ डिसेंबर रोजी कोविड प्रकरणांनी एकूण १०० दशलक्ष एवढी संख्या ओलांडली. अमेरिकेतील वाढत्या इन्फ्लूएंझा आणि RSV प्रकरणांमध्ये, तथाकथित “ट्रिपलेडेमिक” मुळे अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण येऊ शकतो.

दक्षिण कोरिया:

२३ डिसेंबर रोजी एका दिवसात दक्षिण कोरियामध्ये ६८,००० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. ख्रिसमसच्या आठवड्याच्या शेवटी कमी चाचण्यांमुळे सोमवारी देशातील नवीन कोविड-१९ प्रकरणे ३०,००० च्या खाली गेली. देशाने २५,५४५ नवीन कोरोनाव्हायरस संसर्गाची पुष्टी केली, ज्यात परदेशातील ६७ जणांचा समावेश आहे, रुग्णांची एकूण संख्या २८,६८४,६०० झाली आहे, योनहाप वृत्तसंस्थेने कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक एजन्सी (KDCA) च्या हवाल्याने सांगितले आहे.

ब्राझील:

ब्राझीलमध्येही मोठ्या संख्येने कोविड प्रकरणे नोंदवली जात आहेत. ब्राझीलमधील संसंसर्ग पाहता हे नाव प्रवासाच्या यादीत नसणेच योग्य आहे.

जर्मनी:

जर्मनीत देखील आता कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जर्मनीमध्ये गेल्या काही दिवसांत दररोज ४०,००० हून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत.

फ्रान्स:

फ्रान्सदेखील काही दिवसांपासून कोविडच्या निशाण्यावर असल्याचे दिसून येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार. फ्रान्समध्येही गेल्या २८ दिवसांत १० लाखांहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि या देशात कोविड प्रकरणेही झपाट्याने वाढत आहेत.

हे ही वाचा:

Salman Khanच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नजर टाकूया त्याच्या आतापर्यंतच्या टॉप १० चित्रपटांवर

Salman Khan च्या वाढदिवसानिम्मित रितेश आणि जिनिलियाची स्पेशल पोस्ट, दिल्या भरभरुन शुभेच्छा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version