spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Republic Day 2023, यंदा प्रजासत्ताक दिनानिम्मित व्हाट्सअँप द्वारे द्या शुभेच्छा!

भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी रोजी करण्यात आली होती. त्यामुळे हा दिवस प्रजसत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी रोजी करण्यात आली होती. त्यामुळे हा दिवस प्रजसत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे भारतात विशेष महत्व आहे. भारताच्या विविधतेचे वैशिष्ट्य या दिवशी दिसून येते. २६ जानेवारी हा दिवस मोठ्या उत्सहात संपूर्ण भारतात साजरा केला जातो. शाळा-कॉलेज असो, सोसायटी असो सगळीकडे प्रजसत्ताक दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी दरवर्षी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. नवी दिल्ली येथे मोठा उत्साह असतो या दिवशी असतो. तसेच लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद हा दिसून येतो. तसेच या दिवशी अनेकजण शुभेच्छा देऊन आपलं आनंद व्यक्त करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा कश्या पद्धतीने द्यायच्या ते सांगणार आहोत .

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी भारतदेश घडविला
प्रजासत्ताक दिनाच्या, सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विचारांचं स्वातंत्र्य, विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत तरी
आम्ही सारे भारतीय एक आहोत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

झेंडा आमुचा प्रिया देशाचा
फडकत वरी महान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

प्रजासत्ताकचा अर्थ एक राष्ट्र, एक भाषा आणि एक झेंडा, प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

हे ही वाचा:

Republic Day 2023 Tiranga Dhokla , यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त घरातल्या घरात बनवा तिरंगा ढोकळा

Republic Day 2023, काश्मिरी खोऱ्यातील कुपवाडामधील महिलांनी तिरंगा तयार करण्याची मोहीम घेतली हाती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss