Friday, September 27, 2024

Latest Posts

Shardiya Navratri 2024: नवरात्रोत्सवात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये? जाणून घ्या सविस्तर

नवरात्रीचे दिवस खूप पवित्र असतात, या दिवसामध्ये तुम्ही उपवास जरी ठेवला नसला तरी या दिवसांमध्ये काही काम चुकूनही करू नये. नवरात्रीत काही काम अवश्य करावे असे केल्याने नवरात्रीच्या उपासनेचे शुभ फळ मिळतात. हिं

यंदा नवरात्री उत्सव गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. नवरात्रोत्सवात संपूर्ण नऊ दिवस दुर्गा देवीची विधिवत पूजा केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपासनेमध्ये दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. हा उत्सव माता दुर्गाच्या ९ अवतारांसाठी आहे, ज्यांची दररोज पूजा केली जाते. ते मानले जाते की या नऊ दिवसांमध्ये माता दुर्गा पृथ्वीवर निवास करते आणि आपल्या भक्तांचे रक्षण करते. मान्यतेनुसार नवरात्रीचे दिवस खूप पवित्र असतात, या दिवसामध्ये तुम्ही उपवास जरी ठेवला नसला तरी या दिवसांमध्ये काही काम चुकूनही करू नये. नवरात्रीत काही काम अवश्य करावे असे केल्याने नवरात्रीच्या उपासनेचे शुभ फळ मिळतात. हिंदूंसाठी हा एक पवित्र सण असल्याने उपवास करण्यापूर्वी आणि देवी दुर्गाची प्रार्थना करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहेत. काय आहेत त्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया.

शारदीय नवरात्रीत या गोष्टी करा:

  • पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावी.
  • दुर्गा मातेला लाल रंग आवडतो. लाल रंग समृद्धी, नशीब, शक्ती आणो प्रेमाचे प्रतीक मानले जाते. नवरात्रीच्या काळात दुर्गा मातेला लाल फुले अर्पण करा आणि लाल रंगाची चुनरी किंवा कपडे अर्पण करा.
  • नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा मातेच्या मंत्राचा जप करा आणि ध्यान करा. यामुळे मनःशांती आणि एकाग्रता वाढते आणि कुटुंबात आनंद मिळतो.
  • नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करा. दुर्गा मातेला दररोज नवीन फुले, फळे आणि मिठाई अर्पण करा.
  • जर तुम्हाला नवरात्रीमध्ये उपवास करायचा असेल तर धार्मिक विधी पाळून उपवास करा आणि फक्त सात्विक अन्न खा.
  • शक्य झाले नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये गरजूंना दान करा आणि त्यांची सेवा करा. हे अत्यंत पुण्यकर्म कर्म मानले जाते आणि ते केल्यास शुभ फळ मिळते.

शारदीय नवरात्रीत या गोष्टी करू नये:

  • नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दिवा पेटवणे खूप शुभ मानले जाते, परंतु जर तुम्ही अखंड दिवा लावत असाल, तर कधीही रिकामे ठेवू नका आणि अखंड दिवा विझू देऊ नका.
  • नवरात्रीच्या नऊ दिवसांत चुकूनही तामसिक अन्न आणि मद्य सेवन करू नये.
  • नवरात्रीच्या काळात नकारात्मकतेपासून दूर राहून चांगल्या विचारांचा अंगीकार करा आणि कोणत्याही प्रकारचे वाद, भांडण टाळा.
  • नवरात्रीमध्ये पूजा करताना शिस्त अवश्य पाळावी. या दिवसांत कोणाबद्दल कठोर वागू नये, राग टाळावा आणि स्वतःला आनंदी ठेवा.

हे ही वाचा:

Shardiya Navratri 2024: यंदाच्या नवरात्रीनिमित्त बनवा खास उपवासाचा बटाटेवडा रेसिपी…

Shardiya Navratri 2024: नवरात्री का साजरी केली जाते? काय त्याचे महत्त्व? जाणून घ्या सविस्तर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss