spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shardiya Navratri 2024 : शारदीय नवरात्र नेमकी किती तारखेपासून सुरु ? जाणून घ्या घटस्थापनेचे महत्व आणि शुभ मुहूर्त…

Shardiya Navratri 2024 : हिंदू धर्मात सण उत्सवांना अतिशय महत्व आहे. गणेशोत्सव संपताच उत्सुकता लागते ती नवरात्रौत्सवाची. सर्वपित्री अमावस्या झाल्यावर शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीचा सण साजरा करण्यास सुरुवात केली जाते. देवीच्या या नऊ दिवसांच्या उत्सवाचेही खूप महत्व मानले जाते. नवरात्रोत्सव देखील देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत विविध मंडळातर्फे आणि अनेक घरांमध्ये देवीच्या रूपाची स्थापना केली जाते.

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय ?
घटस्थापना ३ ऑक्टोबरला करायची आहे. हिंदू पंचागानुसार घटस्थापनेचा शुभ मुहूर्त ३ ऑक्टोबरला सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत ते ८ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील प्रतिपदा तिथी ४ ऑक्टोबरला पहाटे २ वाजून ५८ मिनिटांपर्यंत असणार आहे.

नवरात्रौत्सवात कोणत्या दिवशी कोणत्या रूपाची पूजा करावी ?

३ ऑक्टोबर – घटस्थापना , शैलीपुत्र पूजा
४ऑक्टोबर – ब्रम्हचारिणी पूजा
५ ऑक्टोबर – चंद्रघंटा पूजा
६ऑक्टोबर – कुष्मांडा पूजा
७ ऑक्टोबर – स्कंदामाता पूजा
८ ऑक्टोबर – कात्यायनी पूजा
९ ऑक्टोबर – कालरात्री पूजा
१० ऑक्टोबर – सिद्धिदात्री पूजा
११ ऑक्टोबर – महागौरी पूजा
१२ ऑक्टोबर -विजयादशमी पूजा

घटस्थापनेचे महत्व
नवरात्रौत्सवात देवीच्या विविध रूपांचे पूजन केले जाते आणि त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्राच्या दिवसांमध्ये दुर्गा देवीने महिषासुराशी युद्ध केले होते. दहाव्या दिवशी देवीने महिषासुराशी झालेल्या युद्धात विजय प्राप्त केला. त्या प्रसंगापासून अश्विन महिन्यातील हे नऊ दिवस दुर्गा देवीचे आणि तिच्या रूपांचे पूजन केले जाते. अशी मान्यता आहे की, नवरात्रात देवी स्वतः पृथ्वीवर अवतरित होते. त्यामुळे या दिवसांमध्ये मनोभावे देवीची पूजा अर्चा केली जाते.

हे ही वाचा:

लोकशाही आणि लोकशक्तीला घाबरणारे हे डरपोक सरकार, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांवरून Sanjay Raut यांचा महायुती सरकारवर निशाणा

Raj Thackeray Vision Worli: Sandeep Deshpande हा राजकीयदृष्ट्या जागृत आणि अभ्यासू मुलगा, तो आमचा हिरा! ठाकरेंकडून देशपांडेंचे कौतुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss