Shardiya Navratri 2024 : नवरात्रीत देवीला नैवेद्यात दाखवा हे खास पदार्थ; तुमच्यावर होईल कृपादृष्टी

Shardiya Navratri 2024 : नवरात्रीत देवीला नैवेद्यात दाखवा हे खास पदार्थ; तुमच्यावर होईल कृपादृष्टी

Shardiya Navratri 2024 : यावर्षी शारदीय नवरात्रौत्सव ३ ऑक्टोबरला सुरु होणार असून १२ ऑक्टोबरला संपणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. पहिली शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायनी, सातवी कालीमाता, आठवी महागौरी, नववी सिद्धिदात्री. या नऊ दिवसांमध्ये भक्त देवीची विधिवत पूजा करून विविध पदार्थांचा नैवेद्य देवीला अर्पण करतात. प्रत्येक दिवशी नैवेद्यात दाखवल्या जाणाऱ्या पदार्थांमागे एक विशिष्ट कारण असते. परंतु कोणत्या दिवशी देवीला नेमका कोणता पदार्थ नैवेद्यात दाखवावा हे आपण जाणून घेऊयात.

पहिल्या दिवशी माता शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते. माता शैलपुत्रीला कलाकंदाचा नैवेद्य दाखवावा. गाईच्या दुधापासून तयार करण्यात आलेली मिठाई देवीला नैवेद्यात अर्पण करणे शुभ मानले जाते. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. या दिवशी साखरेपासून तयार केलेला पंचामृताचा नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते. तिसर्‍या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. चंद्रघंटा मातेला दुधाच्या बर्फीचा नैवेद्य दाखवला जातो. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते. कुष्मांडा मातेला मालपुआ नैवेद्यात दाखवावा. पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवशी स्कंदमातेला नैवेद्यात केळी अर्पण करावी.

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा केली जाते. या दिवशी कात्यायनी देवीला सुपारी अर्पण करावी. नवरात्रीत सातव्या दिवशी काली मातेची पूजा केली जाते. या दिवशी कात्यायनी देवीला गुळापासून तयार केलेले पदार्थ नैवेद्यात दाखवले जातात. नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. या दिवशी महागौरीला नारळापासून तयार करण्यात आलेले पदार्थ दाखवावे. नवरात्रीत नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. या दिवशी माता सिद्धिदात्रीला रव्याची खीर, पुरी आणि काळ्या हरभऱ्याचा नैवेद्य दाखवावा.

हे ही वाचा:

Akshay Shinde Encounter: आधी भरचौकात फाशी देण्याची मागणी मग आता त्या नराधमाविषयी एवढी आपुलकी कशी वाढली? Naresh Mhaske यांचा सवाल

Akshay Shinde Encounter: असे अजून दहा-पंधरा ठोकले तरी काय हरकत नाही पण…काय म्हणाले Nilesh Rane?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version