Shardiya Navratri 2024: नवरात्री का साजरी केली जाते? काय त्याचे महत्त्व? जाणून घ्या सविस्तर…

यावर्षी शारदीय नवरात्री ३ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस भक्त दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील करतात. असे मानले जाते की, दुर्गा देवीची नऊ दिवस भक्तिभावाने पूजा केल्याने ती आनंदी होते आणि भक्तांचे सर्व त्रास दूर होतात.

Shardiya Navratri 2024: नवरात्री का साजरी केली जाते? काय त्याचे महत्त्व? जाणून घ्या सविस्तर…

हिंदू दिनदर्शिकेनुसार शारदीय नवरात्र उत्सव दरवर्षी शरद ऋतूमध्ये अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरु होते. नवरात्रीचे विशेष महत्व आहे. यावर्षी शारदीय नवरात्री ३ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस भक्त दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील करतात. असे मानले जाते की, दुर्गा देवीची नऊ दिवस भक्तिभावाने पूजा केल्याने ती आनंदी होते आणि भक्तांचे सर्व त्रास दूर होतात. परंतु तुम्हाला नवरात्र उत्सव का साजरा केला जातो आणि त्याचे महत्त्व काय आहे हे माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊया सविस्तर…

हिंदू धर्मात वर्षातून चार वेळा नवरात्री येते. परंतु चैत्र आणि शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र नवरात्रीपासून केली जाते. त्याचबरोबर शारदीय नवरात्रीचे महत्त्वही वेगळे आहे. असे म्हटले जाते की, शारदीय नवरात्री धर्मावर अनीतीवर आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. धार्मिक मान्यतेनुसार या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवी पृथ्वीवर येते आणि पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते. देवीच्या आगमनाच्या आनंदात हे नऊ दिवस देशभरात दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच भक्त कलश स्थापना म्हणजे घटस्थापना करतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये भक्त उपवास देखील करतात.

नवरात्री सण देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. नवरात्रोत्सव साजरा करण्यामागे दोन पौराणिक कथा आहेत. पहिल्या कथेनुसार महिषासुर नावाच्या राक्षसाने ब्रम्हदेवाला प्रसन्न केले आणि वरदान मागितले की, विश्वातील कोणताही देव, राक्षस किंवा पृथ्वीवरील मनुष्य त्याला मारू शकत नाही. हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने दहशत निर्माण करायला सुरुवात केली. त्याची दहशत थांबवण्यासाठी दुर्गा देवी शक्तीच्या रूपात जन्माला आली. दुर्गा देवी आणि महिषासुर यांच्यांतील युद्ध नऊ दिवस चालले आणि दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला.

दुसऱ्या कथेनुसार जेव्हा भगवान श्री राम लंकेवर हल्ला करणार होते त्यापूर्वी त्यांनी माता भगवतीची पूजा केली. रामाने रामेश्वरमध्ये नऊ दिवस देवीची पूजा केली आणि त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने श्री रामाला विजयाचे आशीर्वाद दिले. त्यानंतर दहाव्या दिवशी रामाने रावणाचा पराभव करून लंका जिंकली. या दहाव्या दिवशी विजयादशमीचा सण म्हणजेच दसरा साजरा केला जातो.

हे ही वाचा:

Flipkart Sale : iPhone 15 Pro आत्तापर्यंत सर्वात स्वस्त किमतीत उपलब्ध, ३०,००० रुपयांपर्यंत बचत…

कोण मारणार बाजी? Mumbai University Senate Election 2024 चा आज लागणार निकाल…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version