Shivjayanti 2023, शिवजयंतीनिमित्ताने जाणून घ्या शिवजयंतीचे महत्व

१९ फेब्रुवारीला शिवजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील (maharashtra) लोक ही जयंती अगदी एका सणाप्रमाणे साजरी करतात. महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशात शिवजयंती साजरी होत आहे. महाराष्ट्रातील सर्व लोक शिवाजी महाराजांवर प्रेम करतात. शिवाजी महाराजांची कीर्ती आपल्या सगळ्यांना माहित आहे.

Shivjayanti 2023, शिवजयंतीनिमित्ताने जाणून घ्या शिवजयंतीचे महत्व

१९ फेब्रुवारीला शिवजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील (maharashtra) लोक ही जयंती अगदी एका सणाप्रमाणे साजरी करतात. महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशात शिवजयंती साजरी होत आहे. महाराष्ट्रातील सर्व लोक शिवाजी महाराजांवर प्रेम करतात. शिवाजी महाराजांची कीर्ती आपल्या सगळ्यांना माहित आहे. या स्वराज्याच्या राजाने तमाम मराठमोळ्या मावळ्यांना खूप प्रेम दिले आहे. त्यामुळे शिवरायांची जयंती हि दरवर्षी अगदी जलोषाने साजरी करण्यात येते.

शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रासाठी एका उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो . सर्व स्तरांतून शिवजयंती साजरी करत असताना प्रत्येक जण आपापल्या परीने शिवरायांना मानवंदना देण्याचा प्रयत्न करत असतो. या दिवशी त्यांच्या प्रतिमेची पूजा केली जाते , तर काहीजण सार्वजनिक मिरवणूक काढतात. विविध कार्यक्रमांच्या साहाय्याने शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडून सांगितला जातो. त्यासाठी नृत्य, संगीत, वादन, अभिनय अशा विविध कलांचे प्रदर्शन केले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचा जन्मदिवस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाचा क्षण असतो. छ. शिवाजी महाराजांच्या जन्म दिवसाला शिवजयंती (Shivjayanti), शिवजन्मोत्सव (Shiv Janmotsav) असेही म्हणतात. शिवाजी महाराज हे एक थोर महापुरुष महाराष्ट्राला लाभले . त्यांचे विचार, त्यांचे कर्तृत्व, स्वराजाची स्थापना तसेच राज्य कारभार कसा सांभाळावा असे सर्व शिक्षण त्यांनी मराठ मोळ्या मावळ्यांना दिले. महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण व्हावे यासाठी आपले प्राणपणाला लावून युद्ध केले. या रयतेच्या राज्याला मानवंदना देण्यासाठी शिवजयंती प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर समाजातील सर्व स्तरांतील लोकांकडून साजरी केली जाते .

हे ही वाचा :

शिंदे गटाचं ‘सोशल मीडिया स्ट्राईक’, प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण ठेवून व्यक्त केला आनंद

Uddhav Thackeray यांनी बोलावली तातडीची बैठक, काय असेल पुढील भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version