Shravan 2023, आजपासून निज श्रावण मासारंभ, जाणून घ्या सविस्तर…

२०२३ या वर्षाचा श्रावण महिना खूप खास आहे. यावर्षी श्रावण महिना ३० दिवसांचा नसून ५९ दिवसांचा आहे.

Shravan 2023, आजपासून निज श्रावण मासारंभ, जाणून घ्या सविस्तर…

२०२३ या वर्षाचा श्रावण महिना खूप खास आहे. यावर्षी श्रावण महिना ३० दिवसांचा नसून ५९ दिवसांचा आहे. या वर्षी अधिक श्रावण महिना आला आहे. अधिक श्रावण मास १८ जुलै ते १४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत आला आहे. तर निज श्रावण मास हा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या तारखेनुसार असणार आहे. १७ ऑगस्टला सुरु होणार हा श्रावण महिना १४ सप्टेंबर ला संपणार आहे. आजपासून (१७ ऑगस्ट) श्रावण महिन्यला सुरवात झाली आहे. श्रावण महिन्यात येणार प्रत्येक सणाला खूप महत्व आहे असे फार पूर्वी पासून मानले जाते. या वेळचा श्रावण महिन्यात ८ सोमवार आले आहेत. ४ सोमवार हे अधिक श्रावणातील तर ४ सोमवार हे निज श्रावणातील आले आहेत. प्रत्येक वर्षात येणार श्रावण महिन्यला खूप महत्व आहे. या महिन्याला रोग, विकार आणि आजार दूर करणारा महिना म्हणून सुद्धा ओळखले जाते. श्रावणात केलेल्या शंकराच्या पूजेला खूप महत्व आहे.

या महिन्यात शिवपुजेला खूप महत्वाचे स्थान आहे. या महिन्यात येणार श्रावणात सोमवार २१ आणि २८ ऑगस्ट रोजी आले आहेत. पहिल्या सोमवारी नागपंचमी तर दुसऱ्या सोमवारी प्रदोष तिथी असा शुभ संयोग आहे. हे सोमवार शंकराचा पूजेसाठी शुभ दिवस आहे. सोमवारी उपवास केल्या नंतर शिव आणि पार्वती आपल्या वर प्रसन्न होते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी उपवास करण्याची प्रथा आहे. या दिवसामध्ये शिव पार्वती ची पूजा केल्यामुळे सुख समृद्धी आणि सौख्य लाभते.

श्रावणामध्ये नागपंचमीला खूप महत्वाचे स्थान दिले गेले आहे. २१ ऑगस्ट रोजी नागपंचमीचा उपवास केला जातो. त्यानंतर मंगळागौरी चा पूजेला सुरवात होते. या कालावधीत अनेक व्रत केले जातात. २५ ऑगस्ट रोजी वरलक्ष्मी पाळले जाते. त्या नंतर महिन्याचा शेवटी रक्षाबंधन (३१ ऑगस्ट) ला साजरा केले जाते. याच दिवशी श्रावणातील पौर्णिमा असेल. पवित्र श्रावणातल्या तिसऱ्या तिथीला हरियाली तीज असे बोले जाते . याच श्रावण महिन्यात सगळीकडे हिरवगार आणि प्रसन्न वातावरण असते. आणि याच महिन्यात रक्षाबंधन, नागपंचमी, श्रावणी सोमवार असे सण साजरा केले जातात. हरियाली तिज हा सण पतीचा दीर्घायुषसाठी स्त्रिया साजरा करतात.

हे ही वाचा:

कासवांमध्ये नेमकं काय असतं, की त्यांची तस्करी केली जाते? आणि कोणत्या कासवांची आहे जास्त डिमांड…?

Andheri तील धक्कादायक घटना आली समोर, गावठी दारु प्यायल्याने एकाचा मृत्यू तर…

तुळजाभवानीच्या दर्शनाला ‘बापल्योक’ चित्रपटाची टीम

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version