…. तर हे आहेत नवरात्रीचे नऊ रंग

नवरात्र हा हिंदू धर्मातील स्त्रियांचा प्रमुख उत्सव म्हणून ओळखला जातो.

…. तर हे आहेत नवरात्रीचे नऊ रंग

नवरात्र हा हिंदू धर्मातील स्त्रियांचा प्रमुख उत्सव म्हणून ओळखला जातो. हा सण पूर्ण भारतात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने केला जातो. नवरात्र हा नऊ रात्रींचा उत्सव असतो, ज्यात सर्व स्त्रिया देवीच्या नऊ वेगवेगळया रुपांचे पूजन करीत असतात. तब्बल नऊ दिवस रोज वेगवेगळया प्रकारचे नैवैद्य देवीपुढे ठेवत असतात. हिंदु संस्कृतीत नवरात्र हा उत्सव देवी दुर्गेला समर्पित असा उत्सव आहे. संस्कृत मधे नवरात्री या शब्दाचा अर्थ “नऊ रात्री” असा आहे. दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा हा सण साजरा केला जातो.

हे ही वाचा :बीडमधील परळीची ओळख असलेली चिमणी जमीनदोस्त

 

नवरात्र हा सण सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्यात येतो. तेव्हा प्रत्येकजण घटस्थापना करतात. भाविकांच्या घरी आणि मंदिरात दुर्गेची स्थापना केली जाते. आणि स्त्रिया नऊ दिवस भक्तिभावाने उपवास करतात काही जण निर्जळी उपवास देखील करतात. काही ठिकाणी देवीला वेगवेगळया रंगाच्या नऊ दिवस वेगवेगळ्या साड्या देखील नेसवल्या जातात. फळ म्हणून नैवैद्य दाखवले जातात आणि फुले, फळे अर्पण करून तिची पूजा करतात. मंदिरात आणि घरात लोक एकत्र येऊन नऊ दिवस गायन,आणि भजन देखील करतात. नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी फुलांच्या वेगवेगळ्या माळा घालतात. गणपतीची देवीची आरती म्हटली जाते. देवी जवळ नऊ दिवस अखंड दिवा लावला जातो. या नवरात्रीच्या कालावधीत कुमारिकांची पूजा केली जाते आणि त्यांना भेटवस्तू दिली जाते. अनेक बायका नवरात्रीमध्ये घरोघरी जाऊन जोगवे मागतात. या नवरात्रीच्या दिवसात जागरण- गोंधळ याचा कार्यक्रम केला जातो. देवी समोर वेगवगेळ्या पद्धतीने देवीच्या दरबारात गरबा खेळला जातो. सार्वजनिक मंडळात आपल्याला देवीचे वेगवेगळे रूप पाहायला मिळतात.

 

या नवरात्री उत्सवाच्या आधी सर्व महिलांना वेध लागतात ते नवरात्रीच्या नऊ रंगाचे. नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा दुर्गा देवीच्या नऊ रूपांना समर्पित आहे. नवरात्रीचे हे नऊ रंग त्या त्या देवीच्या गुणांचे प्रतिक आहेत. जरी प्रत्येक वर्षी हे नऊ रंग सारखे असले तर प्रत्येक वर्षी या नऊ रंगाचा क्रमवार हा बदलला जातो. तर आज आपण प्रथमतः हे नऊ रंग नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊया…

नवरात्रीचे नऊ रंग –

२६ सप्टेंबर – पांढरा
२७ सप्टेंबर – लाल
२८ सप्टेंबर – शाही निळा
२९ सप्टेंबर – पिवळा
३० सप्टेंबर – हिरवा
१ ऑक्टोबर – राखाडी
२ ऑक्टोबर – नारिंगी
३ ऑक्टोबर – पोपटी
४ ऑक्टोबर – पिंक

 

हे ही वाचा :

पैठणमधील मुख्यमंत्र्यांच्या सभेला लोकांची तुफान गर्दी, पैसे देऊन गर्दी गोळा केल्याचा शिवसेनेचा आरोप

 

Exit mobile version