Mahashivrtari 2023, महाशिवरात्री निम्मित द्या खास शुभेच्छा… !

Mahashivrtari 2023, महाशिवरात्री निम्मित द्या खास शुभेच्छा… !

माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री (Mahashivratri) साजरी केली जाते. महाशिवरात्रीला हिंदू संस्कृतीमध्ये मोलाचे स्थान आहे. या दिवशी शिवभक्त शिवमंदिरात जाऊन रुद्राभिषेक, पूजा करतात. देशभरात शिवजयंती साजरी केली जाते. शिवभक्त रात्रभर जागरण (jagran) करून मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे विशेष आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शिवभक्त (Devotees of Shiva) मंदिरात जाऊन दर्शनाचा लाभ घेऊ शकतील. तसेच, सर्व नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश महाशिवरात्रीनिमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दुख दारिद्रय नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो या
महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्या अडचणीवर नसतो कुठला उपाय
त्यावेळी फक्त नामस्मरण हाच एक तोडगा
म्हणा ऊॅं नम: शिवाय
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..
तुज विण शंभु मज कोण तारी…
हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

ॐ नमः शिवाय
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
हर हर महादेव !

धर्म अर्थ काम मोक्ष।
शिवा देखता प्रत्यक्ष।
एका जनार्दनी शिव।
निवारी कळिकाळाचा भेव॥
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी
आनंदच आनंद देवो…
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

हे ही वाचा : 

Breaking, केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाच्या निकालांनंतर ठाकरे गटाकडून संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version