या दिवशी साजरा होणार गणपतीच्या आगमनाचा सोहळा, जाणून घ्या गणेश चतुर्थीची तारीख आणि वेळ

पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) साजरी केली जाते. गणेश चतुर्थी महाराष्ट्रात (Mahrashtra) तसेच देशाच्या अनेक भागात मोठ्या थाटामाटात साजरा केली जाते.

या दिवशी साजरा होणार गणपतीच्या आगमनाचा सोहळा, जाणून घ्या गणेश चतुर्थीची तारीख आणि वेळ

पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) साजरी केली जाते. गणेश चतुर्थी महाराष्ट्रात (Mahrashtra) तसेच देशाच्या अनेक भागात मोठ्या थाटामाटात साजरा केली जाते. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून ते पुढील नऊ दिवस घरोघरी व पंडालांमध्ये गणेशमूर्तीची स्थापना करून पूजा केली जाते. परंतु काही लोक गणेशाची मूर्ती ९ दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठीही बसवतात.यानंतर बाप्पाचे विधिवत विसर्जन केले जाते. गणेश चतुर्थीचा शुभ काळ आणि महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. यंदाचा गणेश चतुर्थीचा सण बुधवार, ३१ ऑगस्ट रोजी साजरा होत आहे.

गणेश चतुर्थी तिथी आणि मुहूर्त 

या वस्तू गणेशाला अर्पण करा

गणेशाच्या पूजेमध्ये मोदक अर्पण करणे हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय मोतीचुराचे लाडू आणि बेसनाचे लाडूही बाप्पाला अतिशय प्रिय आहेत असे मानले जाते. तसेच गणपतीला गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सहाव्या दिवशी खीर अर्पण करणे चांगले मानले जाते

गणेश चतुर्थीचे महत्व

पौराणिक कथेनुसार, भगवान गणेशाची (Ganesha) निर्मिती पार्वतीने मळापासून केली होती. शक्तीची देवता असल्याने, त्यांनी गणेशाला इतक्या सामर्थ्याने जागृत केले की मोठ्या देवांनाही युद्धात त्याचा सामना करता आला नाही. देवतांच्या युद्धात भगवान शिवाने (Lord Shiva) चुकून गणेशाचा शिरच्छेद केला. त्यामुळे पार्वतीचा (Godess Parvati) राग अनावर झाला.त्यानंतर भगवान शिवांनी इतर देवतांसह हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या धडावर ठेवले. त्यामुळे हत्तीमुखी श्रीगणेशाची निर्मिती झाली. गणेश चतुर्थीच्या या शुभ दिवशी, भगवान शिवाने घोषित केले की गणेश हा एकमेव देव असेल ज्याची इतर कोणत्याही देवाआधी पूजा केली जाईल. बुद्धीची आणि शक्तीची देवता म्हणून त्यांची नेहमी पूजा केली जाते.

हे ही वाचा:

सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपट पाहायला पसंत करता तर, हा चित्रपट आवर्जून पहा

Exit mobile version