कहाणी भारतातील पहिल्या ख्रिसमस केकची; जाणून घ्या कसा अन् कुणी बनवला

दरवर्षी नाताळचा सण (Christmas) २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

कहाणी भारतातील पहिल्या ख्रिसमस केकची; जाणून घ्या कसा अन् कुणी बनवला

दरवर्षी नाताळचा सण (Christmas) २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. जगभरात ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी लोक चर्चमध्ये जातात. प्रार्थना करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देत केक खाऊ घालतात. या दिवशी केक कापण्याची परंपरा आहे. पण ही परंपरा नेमकी कुठून आली? याची सुरुवात कशी झाली? आणि पहिल्यांदा कधी केक कापला गेला या संदर्भात तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर, या ख्रिसमसच्या निमित्ताने जाणून घ्या ख्रिसमस केकची कहाणी.

सुरुवातीला ख्रिसमसला केक कापण्याची प्रथा नव्हती. ख्रिसमसच्या दिवशी केक कापण्याची संकल्पना १६ व्या शतकापासून सुरुवात झाली. ख्रिसमसच्या दिवशी कधीही केक कापला गेला नव्हता. तेव्हा ब्रेड आणि भाज्या मिसळून एक डिश बनवली जायची ज्याला ‘प्लम पुडिंग’ असे म्हणायचे. १६ व्या शतकात पुडिंग काढून त्यात गव्हाचे पीठ वापरले जात असे. त्यात अंडी, लोणी आणि उकडलेल्या फळांचा प्लम टाकला जात असे. काही लोकांनी हा पदार्थ ओव्हनमध्ये ठेवून तयार केला. त्याचप्रमाणे, हळूहळू या डिशने केकचे रूप धारण केले. तेव्हापासून ख्रिसमला केक कापला जाऊ लागला.

ख्रिसमसला बनवलेला केक महिनाभर आधीपासून बनवायला लागतो. कारण नाताळच्या दिवशी केकला सर्वाधिक मागणी असते. पण फ्रुट केकला सर्वाधिक मागणी राहते. या केकमध्ये ड्रायफ्रुट्सचे प्रमाण जास्त असते. लोक प्लम केक देखील खरेदी करतात. ख्रिसमच्या दिवशी वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या केकला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते.ख्रिसमसला बनवलेल्या केकमध्ये ड्रायफ्रूट्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कारण ड्रायफ्रूट्स शरीरासाठी चांगले असतात, हेल्दी असतात. यामुळे शरीराला ऊर्जा सुद्धा मिळते. केकमध्ये ड्रायफ्रूट्स घातल्याने केकची चव अधिक वाढते. त्यामुळे केकमध्ये ड्रायफ्रूट्सचा वापर केला जातो.

हे ही वाचा:

सोन्याची जेजुरी! गडावर फळांची आणि फराळाची आकर्षक आरस

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेची स्ट्रगल स्टोरी,बालपणीतल्या कष्टांच्या दिवसांना उजाळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version