Janmashtami 2023, यंदा बाळगोपाळाचा पाळणा सजवा अनोख्या पद्धतीने, ‘या’ टिप्स करा फॉलो

कृष्ण जन्माष्टमी हा सण अनेक ठिकाणी उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचे आयोजन ही केले जाते. दहीहंडी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेचाच भाग मानला जातो. श्रीकृष्णाचे भक्त या दिवसाची फार आतुरतेने वाट पाहत असतात.

Janmashtami 2023, यंदा बाळगोपाळाचा पाळणा सजवा अनोख्या पद्धतीने, ‘या’ टिप्स करा फॉलो

कृष्ण जन्माष्टमी हा सण अनेक ठिकाणी उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचे आयोजन ही केले जाते. दहीहंडी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेचाच भाग मानला जातो. श्रीकृष्णाचे भक्त या दिवसाची फार आतुरतेने वाट पाहत असतात. धार्मिक मान्यतांनुसार जन्माष्टमीच्या दिवशी श्री कृष्णाचा जन्म झाला होता. भक्तांमध्ये या दिवसाचा उत्साह खूप आधीपासूनच दिसतो. बाळकृष्णाला सजवण्यासाठी भक्त खरेदी ही सुरू करतात. त्यांमुळे बाजार या सामानाने फुललेला असतो. बाळकृष्णासाठी कपडे, बासरी, श्रृंगाराचे सामान, पाळणा आणि पाळणा सजवण्याचे सामान असे बरेच काही बाजारात आलेले असते. लोक ते खूप श्रध्देने खरेदी करतात. जर तुम्ही बाळकृष्णाच्या पाळण्याला आकर्षिक पद्धतीने सजवण्याच्या टिप्स शोधत असाल तर जाणून घ्या.

बाळकृष्णाला असे सजवा –
कृष्ण जन्माष्टमीला कृष्णाच्या अर्भक रूपाची पूजा केली जाते. म्हणून, या दिवशी बाळकृष्णाची मूर्ती आवश्यक आहे. काही लोकांच्या घरी सहसा पारंपरिक मंदिर असते. ती नसल्यास बाळकृष्णाची एक लहानशी मूर्ती बाजारातून घ्या. त्या मूर्तीला नवीन कपडे घाला. त्यावर आभूषणे, मुकूट आणि गळ्यात ताज्या फुलांची माळ घाला. पाळण्यात बासरी ठेवून बाळकृष्णाला त्यात बसवा.

पाळणा असा सजवा –
बाजारातून तयार पाळणा आणा. पाळणा सजवण्यासाठी रंगीबेरंगी लाइट किंवा फुल वापरू शकतात. त्यावर मखमली सुंदर कापड वापरा व छोटी गादी ठेवा. पाळण्याच्या आजूबाजूला फुलांच्या पाकळ्या आणि पाने टाकून छान सजवावे. तुमच्याकडे ताजी फुले नसल्यास, तुम्ही सजावटीसाठी कृत्रिम फुले ही वापरू शकता. त्यानंतर तिथे दिवा लावावे. पाळण्याला एक लहानशी छोटी दोरी बांधून ती फुलांनी छान सजवावी. त्या समोर सुरेख रांगोळी काढावी.

दही हंडीची व्यवस्था करा –
दही हे भगवान श्रीकृष्णाला आवडते. हे घरातील कृष्ण जन्माष्टमीच्या सजावटीचा अविभाज्य भाग असते. जन्माष्टमीच्या पूजेनंतर या वस्तूही श्रीकृष्णाला अर्पण केल्या जातात. घरामध्ये जन्माष्टमीच्या परिपूर्ण सजावटीसाठी, दही किंवा लोणीने भरलेली हंडी ठेवा आणि दुकानांमध्ये सहज उपलब्ध असलेल्या ठेवली. ती पेंट डिझाइन, आरसे आणि सोनेरी लेसने छान सजवा. जर तुम्हाला दही किंवा लोणी आवडत नसेल तर ती दहीहंडी कापसाने भरा.

 

हे ही वाचा: 

Exit mobile version