Tripurari Poornima 2022 : त्रिपुरारी पौर्णिमा कथे बद्दल आणि पुजाविधी बदल जाणून घ्या…

Tripurari Poornima 2022 : त्रिपुरारी पौर्णिमा कथे बद्दल आणि पुजाविधी बदल जाणून घ्या…

भारत संस्कृतीमध्ये कार्तिक या महिन्याला खूप महत्व आहे. कार्तिक महिन्यात लक्ष्मी आणि विष्णूची पूजा केली जाते. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे तुळशी विवाहनंतर साजरी करण्यात येते आणि यामध्ये तुळशी विवाहबद्दल शुभेच्छा दिल्या जातात. यावेळी त्रिपुरारी पौर्णिमा मंगळवार, ८ नोव्हेंबर २०२२ रोजी साजरी करण्यात येत आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला खूप महत्व आहे. त्रिपुरा पौर्णिमीचा आधीच दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूची दोन पवित्र तत्वे म्हणजे शिव आणि विष्णू यांची भेट होते. त्यासाठी प्रत्येक जण घरात दिवे लावून रोषणाई करतात. आणि अंगणात रांगोळया काढल्या जातात. फटाके देखील फोडले जातात. “चांगले ते रुजावे आणि वाईटाचा नाश व्हावा” असा त्रिपुरा पौर्णिमेचा उद्देश आहे.

हे ही वाचा: Diwali 2022 : तुळशी विवाहाची संपूर्ण विधी, जाणुन घ्या

 

त्रिपुरासुर नावाचा एक राक्षस होता. त्याने ब्रम्हदेवाची तपस्या केली. ब्रम्हदेव प्रसन्न झाल्यानंतर त्याने ब्रम्ह देवाकडून असे वरदान मागितले की, मला या पुढे कोणाचेही भिती राहणार नाही. ब्रम्ह देवाने हे वरदान दिल्यानंतर तो देवांनाही मोठ्या प्रमाणात त्रास देऊ लागला. त्यानंतर त्रिपुरासुराचा वध करायचे देवांनी ठरवले. पण काही कारणामुळे त्याचा वध करता येत नव्हता. त्यानंतर सर्वांनी शंकर देवा कडे मागणी केली त्याचा वध करण्यासाठी. त्यानंतर शंकरानी त्याचा त्रिशुळाने वध केला. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्याचा वध करण्यात आला होता. त्यानिमित्याने घरासमोर दिवे लावण्याची प्रथा आहे. म्हणून कार्तिक महिन्यात त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात येते.

त्रिपुरारी पौर्णिमा (Tripurari Poornima) : ७ नोव्हेंबरला प्रारंभ होणार वेळ ४:१०
८ नोव्हेंबरला समाप्ती होणार वेळ ४:३०

 

पुजाविधी :

सकाळी लवकर उठून पाण्यात गंगाजल घालून स्नान करावे.

नंतर लक्ष्मी नारायणाचे पूजन केले जाते.

देवासमोर तूपाचा दिवा लावणे.

या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणे शुभ मानले जाते.

आणि देवासमोर सत्यनारायणाची कथा वाचावी.

देवाला गोडाचा नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी.

तुळशीचे पूजन आणि आरती करावी.

संध्याकाळी घराबाहेर दिवे लावावे.

शिवाय या दिवशी दीपदान करावे.

दीपदानाचे या दिवशी खास महत्व आहे.

हे ही वाचा:

Diwali 2022 : यंदा तुळशी विवाह कधी ? जाणून घ्या शुभ मुहूर्त…

 

Exit mobile version