spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Independent day vs Republic day या दोन दिवसांमध्ये नक्की काय फरक आहे ?

प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी स्वतंत्र दिवस आणि प्रजासत्ताक दिनाचे वेगळे असे महत्व आहे. हे दोन्ही दिवस देशाला अर्पण असतात असे म्हंटले तरी वावगे वाटणार नाही. देशासाठी आपले प्राण गमावलेल्या लोकांना या दिवशी मानवंदना दिली जाते.

प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी स्वतंत्र दिवस आणि प्रजासत्ताक दिनाचे वेगळे असे महत्व आहे. हे दोन्ही दिवस देशाला अर्पण असतात असे म्हंटले तरी वावगे वाटणार नाही. देशासाठी आपले प्राण गमावलेल्या लोकांना या दिवशी मानवंदना दिली जाते. वीर जवानांचे स्मरण केले जाते. या दिवसांचे भारतीय इतिहासात फार मोलाचे स्थान आहे. पण हे दिवस जरी सारखे वाटत असले तरी त्यांचे महत्व मात्र वेगवेगळे आहे. हे दोन्ही दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिवस साजरा केला जातो . कारण या दिवशी भारताला ब्रिटिश राजवटीकडून सुटका मिळाली होती तसेच २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो कारण या दिवशी भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रात अंमल करण्यात आले होते. तसेच या दोन्ही दिवशी देशभरात ध्वजारोहण होते. आपण जाणून घेऊया हे दोन्ही दिवस साजरे करण्याची पद्धत काय आहे.

स्वतंत्र दिवस (Independent day) कसा साजरा केला जातो ?

  • १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिवस साजरा केला जातो . कारण या दिवशी भारताला ब्रिटिश राजवटीकडून सुटका मिळाली होती
  • स्वातंत्र्य दिनानिमित्त हा ध्वज खाली दोरीने बांघला जातो आणि दोरी ओढून फडकवला जातो. याला ध्वजारोहण म्हणतात.
  • या दिवशी पंतप्रधान (PRIME MINISTER) राजकीय पदावर असतात.
  • स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर समारंभ सोहळा पार पडतो. या सोहळ्यात पंतप्रधान ध्वजारोहण करतात आणि देशाला संबोधित करतात.
  • सर्व शाळांमध्ये ध्वजारोहण करून वंदे मात्रम म्हंटले जाते. त्यांनतर देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले जाते तसेच विद्यार्थ्यांना स्वतंत्र दिनाचा इतिहास सांगितलं जातो.

प्रजासत्ताक दिन (Republic Day) कसा साजरा केला जातो ?

  • २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो कारण या दिवशी भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रात अंमल करण्यात आले होते.
  • मात्र २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्याला वर बांधला जातो. आणि तो पुर्ण फडकवला जातो, याला ध्वज उभारणे म्हणतात. घटनेत त्याचा उल्लेख करून या प्रक्रियेला ध्वज फडकावणे असे म्हटले गेले.
  • प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर तिरंगा ध्वज फडकवतात.आणि या ठिकाणी परेडचे आयोजन केले जाते.
  • या दिवशी नवी दिल्ली येथे मोठा सोहळा पार पाडला जातो. तसेच वीर जवानांना २१ तोफांची मानवंदना दिली जाते.

  • तसेच भारताचे पहिले नागरिक भारताचे राष्ट्रपती (President) या दिवशी ध्वज फडकवतात. याचे प्रमुख कारण म्हणजे राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतात.
  • २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. तसेच या दिवशी भारताला पहिला राष्ट्रपती मिळाला होता व या जागी राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली होती.

हे ही वाचा:

१८ हजार फूट उंचीवर आणि -४० डिग्री तापमानात उपोषण, सोनम वांगचुकला का करावी लागली पंतप्रधान मोदींकडे याचना?

Tu Jhoothi Main Makkaar चित्रपट येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस, ट्रेलरमध्ये रणबीर आणि श्रद्धांची रोमँटिक केमिस्ट्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss