spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Navratri 2022 : काय आहे नवरात्रातील अखंड ज्योतचं महत्व ? घ्या जाणून

हिंदू धर्मात नवरात्रीचा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो.

हिंदू धर्मात नवरात्रीचा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. वर्षभरात नवरात्रीचा सण माँ दुर्गेच्या उपासनेसाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. नवरात्री मध्ये अखंड दिवा लावणे याचे खूप महत्व आहे. अखंड दिवा लावल्यास सुख समृद्धी नांदते असे म्हणतात. अश्विन महिन्यात येणाऱ्या शारदीय नवरात्रीचे विशेष महत्व शास्त्रात सांगितले आहे. यावेळी नवरात्री २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर पर्यंत साजरी करण्यात येणार आहे. नवरात्री मध्ये ९ देवींची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनासोबतच अखंड ज्योत प्रज्वलित केला जाते. अखंड ज्योत म्हणजे असा प्रकाश जो चारही बाजूने पसरेल. नऊ दिवस हा अखंड ज्योत पेटवून ठेवावा लागतो. तर आज आपण जाणून घेऊया नवरात्रीमधले अखंड ज्योत चे महत्व.

हे ही वाचा : Navratri 2022 : नवरात्र हा सण का साजरा केला जातो ?

 

अखंड ज्योतचे महत्व –

  • नवरात्रीच्या काळात घरात तुपाच्या तेलाची ज्योत पेटवल्याने घरात सकारात्मकता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते. व घरात प्रसन्नता आणि निरोगी वातावरण घरात निर्माण होते.
  • जर तुम्ही अखंड ज्योत पेटवली असेल तर घर रिकामी सोडू नका घरात कोणीतरी थांबणे गरजेचे आहे. अखंड ज्योत लावल्यास त्याची काळजी घ्या.
  • अखंड ज्योत लावल्यास श्रद्धेचे प्रतीक मानले जाते.
  • माती आणि पितळ्याचे दिवे पूजेसाठी चांगले असते.
  • नवरात्रीचा काळात मोहरीचे तेल दिवे मध्ये वापरल्यास घरात शांतता राहते आणि समृद्धी ही देखील राहते.
  • अखंड ज्योत पेटवताना दिव्याचा खालचा भाग डावीकडून उजवीकडे लावावा. ते शुभ मानले जाते.

  • नवरात्रीच्या काळात अखंड ज्योत विझवणे अशुभ मानले जाते. जिथे ही ज्योत प्रज्वलित केली जाते, तिथे प्रत्येक वेळी कोणीतरी व्यक्ती समोर असणे आवश्यक आहे.
  • नवरात्री मध्ये अखंड ज्योत लावल्यास त्या ज्योत समोर ९ दिवस देवीचा जप करावा जे घरासाठी शुभ मानले जाते.

हे ही वाचा :

नरेंद्र मोदी एक प्रभावशाली व्यक्तिमहत्व, वाचा प्रधान मंत्रींच्या संघर्षाचा प्रवास

 

Latest Posts

Don't Miss