श्रावण अधिकमासात काय केले पाहिजे? सविस्तर वाचा

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिना संपूर्णपणे भगवान शिव शंकरला समर्पित केला जातो. या महिन्यात व्रत, उपवास केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि आपली मनोकामना पूर्ण करतात अशी समज आहे.

श्रावण अधिकमासात काय केले पाहिजे? सविस्तर वाचा

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिना संपूर्णपणे भगवान शिव शंकरला समर्पित केला जातो. या महिन्यात व्रत, उपवास केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि आपली मनोकामना पूर्ण करतात अशी समज आहे. यावर्षी मंगळवारपासून, म्हणजेच १८ जुलैपासून ते १६ ॲागस्ट २०२३ पर्यंत अधिक श्रावणमास असणार आहे. अधिक मासला (Adhik Maas) पुरुषोत्तममास, मलमास किंवा धोंड्या महिना असेही म्हणतात. अधिक श्रावणमासानंतर गुरुवार, १७ ॲागस्ट ते शुक्रवार, १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत निज श्रावणमास येणार आहे. श्रावणी सोमवारचे (Shravani Somvaar) उपवास, मंगळागौरी पूजन, नागपंचमी वगैरे असे श्रावण महिन्यातील सर्व सण-उत्सव-व्रत ही अधिक श्रावणमासात न करता निज श्रावणमासातच करायची आहेत.

पंचांगामध्ये चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घालण्यासाठी एक नियम तयार करण्यात आला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल, त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल, त्याला वैशाख म्हणतात. कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो. त्यावेळी पहिला असतो तो अधिकमास आणि दुसरा तो निजमास म्हणून धरला जातो.

यावर्षीच्या श्रावणी अधिक मासात संपूर्ण दिवस उपवास किंवा एक वेळ भोजन करावे. देवापुढे अखंड दीप लावावा. ३३ अपूप म्हणजे अनारसे यांचे दान केले पाहिजे. ३३ अनारसे भगवान विष्णूला अर्पण करावेत, असे सांगितले जाते, परंतु जावई हा विष्णूसमान मानला जातो आणि म्हणून अधिक मासात जावयाला ३३ अनारशांचे दान देण्याची प्रथा सुरु झाली असावी. इथे ३३ अंकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण तीन वर्षात वाढल्या गेलेल्या ३३ तिथी मानल्या जातात. अधिकमासात नित्य आणि नैमत्तिक कर्मं करावे. मात्र काम्य कर्माचा आरंभ आणि समाप्ती करु नये. केल्यावाचून गती नाही, अशी कर्म अधिक मासात करण्यास हरकत नाही. नामकर्म, अन्नप्राशन, नित्यश्राद्ध हे संस्कार अधिकमासात करायला हरकत नाही. मात्र देवप्रतिष्ठा, चौल, उपनयन, विवाह, संन्यासग्रहण, वास्तुशांती, गृहारंभ या गोष्टी अधिक मासात करु नयेत, असे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

जनतेच्या प्रश्नावर शिंदे सरकारला अधिवेशनात जाब विचारु, नाना पटोले

International Justice Day म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version