दिवाळीचे फराळ ऐनवेळी बिघडल्यास काय करावे ? जाणून घ्या टिप्स

दिवाळीचे फराळ ऐनवेळी बिघडल्यास काय करावे ? जाणून घ्या टिप्स

दिवाळीला फक्त १ दिवस उरलेला आहे. आणि घरोघरी दिवाळीचे फराळ करायला सुरुवात झाली आहे. दिवाळी पदार्थ काही चांगले होतात तर खाही बिघडतात. त्यासाठी महिला पदार्थ बिगडू नये म्हणून खूप कष्ट घेतात. पण काही वेळा असे होते की आपल्याला जमणारा पदार्थ देखील बिगडू शकतो. तर आज आम्ही तुम्हला काही टिप्स सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला पदार्थ बनवायला उत्तम जमेल. दिवाळीचा पदार्थ बनवताना काही टिप्स वापरल्यास पदार्थ अगदी बनवणे सोपा होऊन जातो.

हे ही वाचा :  Diwali 2022 : दिवाळी सणामध्ये हटके लूक करण्याचा विचार करताय ? मग नकी करून बघा बोल्ड आय मेकअप…

 

करंज्या जर मऊ झाल्या तर तुम्ही तवा ठेउन मंद आचेवर त्यावर पेल्ट ठेऊन तुम्ही करंज्या गरम देखील करू शकता. त्यामुळे करंज्या खाण्यासाठी खूप स्वादिष्ट आणि खुसखुशीत लागतात.

चकलीचे पीठ बनवताना जास्त प्रमाणात पीठ घेऊ नका. आधी कमी प्रमाणात चकल्या बनवून घ्या. त्या प्रमाणे तुम्ही पीठाचा अंदाज लावू शकता. आणि त्यानंतर तुम्ही हवे तसे आणि पाहिजे तसे चकल्या बनवू शकता. जर तुम्हाला चकल्या मऊ पाहिजे असतील तर तुम्ही त्यात थोडे तांदळाचे पीठ देखील मिक्स करू शकता. त्यामुळे तुमच्या चकल्या खाण्यासाठी कुरकुरीत होतात.

 

अनारसे जर बिगडत असतील तर त्यात तुम्ही रवा मिक्स करू शकता. आणि रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्ही अनारसे बनवू शकता.

जर चुडा तुमचा नरम झाला असेल तर तुम्ही खाण्यापूर्वी कढईत किंवा भांड्यात चांगला गरम करून खाऊ शकता त्यामुळे तुमचा चिवडा खाण्यासाठी कुरकुरीत होतो.

लाडू बनवतांना जर लाडू फुटले तर परत लाडूच्या मिश्रणामध्ये दूध मिक्सजरुन चांगले परतवून घेणे. आणि परत एकदा लाडू वळवून घेणे.

हे ही वाचा : 

Diwali Gift : एसटी महामंडळाची मोठी घोषणा, एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांची दिवाळी भेट

Exit mobile version