spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Republic Day 2023, का साजरा करावा प्रजासत्ताक दिन? जाणून घ्या प्रजासत्ताक दिनाचे वैशिष्ट्य

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar )यांनी तयार केलेले भारताचे संविधान, संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० पासून भारतीय संविधान अंमलात आले. या दिवशी देशातील कारभार सुरू झाला होता. त्यामुळे याला कामगार दिवस असेही म्हंटले जाते.

प्रजासत्ताक दिनाचा इतिहास (History of Republic Day)

ब्रिटिशांच्या राजवटीतून भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र मिळाले होते. या स्वातंत्र्यात बऱ्याच लोकांचा मोठा वाटा होता. भारताला स्वातंत्र्य (Independent India)मिळाल्यानंतर भारताचे स्वतःचे स्वतंत्र असे संविधान (Constitution)नव्हते. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा (Draft Constitution)तयार करून, तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या मसुदा सगळ्यांनाच मान्य होते असे नाही. या सभेद्वारे सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला गेला. तब्बल २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा मान्य केला.

त्याआधी २ वर्षाच्या कालावधी नंतर अभ्यासपूर्वक संपूर्ण संविधान तयार करण्यात आले. बरेचसे विचार आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आले व २६ जानेवारी १९५० अंमलात आणण्यात आले. त्यामुळे भारताचे संविधान अंमलात येण्याच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठा उत्सव साजरा करून २६ जानेवारी साजरी केली जाते. या दिवशी भारतातील विविधता आणि संस्कृती पाहायला मिळते.

हे ही वाचा:

राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडी घेणार ‘हा’ मोठा निर्णय

पंतप्रधानांवरील माहितीपट हटवण्याचे यूटय़ूब, आणि ट्विटरला केंद्रसरकारने दिले आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss