Christmas हा सण डिसेंबरमध्येच का साजरा केला जातो?

सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे आणि सगळीकडे ख्रिसमसची जोरदार तयारी सुरू आहे. प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण जगात वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिसमस दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो.

Christmas हा सण डिसेंबरमध्येच का साजरा केला जातो?

सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे आणि सगळीकडे ख्रिसमसची जोरदार तयारी सुरू आहे. प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण जगात वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिसमस दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो. तसेच आताच्या जगात फक्त ख्रिस्ती बांधवच नाही, तर इतर लोकही उत्साहाने ख्रिसमस साजरा करताना दिसतात; पण तुम्हाला माहीत आहे का ख्रिसमस हा सण डिसेंबरमध्ये का साजरा केला जातो?

ख्रिस्ती बांधवांचा हा मोठा सण मानला जातो. अनेक जण ख्रिसमस हा ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा करतात; पण तुम्हाला माहीत आहे का सुरुवातीला ख्रिश्चन लोक येशूचा जन्मदिवस साजरा करीत नव्हते. कारण- कुणालाच येशूचा जन्म कोणत्या तारखेला झाला, याविषयी माहीत नव्हते. ख्रिसमसची सुट्टी आणि ही तारीख प्राचीन ग्रीको रोमनमध्ये उदयास आली. कारण- दुसऱ्या शतकापासून येशूचा जन्मदिवस साजरा करण्यास सुरुवात झाली असावी. या डिसेंबरच्या तारखेमागे तीन मुख्य कारणे असू शकतात.

रोमन ख्रिश्चन इतिहासकार सेक्स्टस ज्युलियस ऑफ्रिकन्स याने येशूच्या गर्भधारणेची तारीख २५ मार्च सांगितली होती; ज्या दिवशी जगाची निर्मिती झाली. त्या तारखेच्या नऊ महिन्यांनंतर म्हणजेच २५ डिसेंबरला येशूचा जन्म झाला असावा म्हणून २५ डिसेंबर हा येशूचा जन्मदिवस समजला जातो. तिसऱ्या शतकात रोमन साम्राज्यादरम्यान ज्यांनी त्यावेळी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नव्हता, ते त्यावेळी २५ डिसेंबर हा दिवस सूर्यांचा पुनर्जन्म म्हणून साजरा करायचे. रोमन सण सॅटर्नलिया त्या दिवशी साजरा केला जायचा. या सणाला लोक एकमेकांना खाऊ घालायचे आणि भेटवस्तू द्यायचे. त्याशिवाय २५ डिसेंबर हा इंडो-युरोपियन देवता मिथ्राचा जन्मदिवस होता. ही तेज आणि प्रामाणिकपणाची देवता मानली जाते. त्यावेळी रोमन सैनिक त्याला खूप मानायचे.

रोमच्या चर्चमध्ये कॉन्स्टंटाईनच्या कारकिर्दीत ३३६ मध्ये २५ डिसेंबर रोजी औपचारिकपणे ख्रिसमस साजरा करण्यास सुरुवात झाली. कॉन्स्टंटाईनने त्याच्या साम्राज्यात ख्रिश्चन धर्माला अधिक महत्त्व दिले. काही लोकांना वाटले की, ख्रिसमस साजरा करण्याची तारीख निवडण्यामागे इतर मूर्तिपूजा किंवा उत्सव कमकुवत करण्याचे राजकीय षडयंत्र होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, पूर्वेकडे मात्र ही तारीख स्वीकारली गेली नाही. अर्ध्या शतकापर्यंत तिथे ६ जानेवारीला ख्रिसमस साजरा केला जायचा. नवव्या शतकापर्यंत ख्रिसमस हा महत्त्वाचा सण मानला जायचा नाही.

हे ही वाचा:

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस गाजण्याची शक्यता

पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवली, चार महिन्यात एवढ्या प्रमाणात उत्पादन घटले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version