spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Pitru Paksh 2022 : पितृपक्षात श्राद्ध का करावे, श्राद्ध करण्याची पद्धत काय ?… पितृपक्षाबद्दल सर्व माहिती घ्या जाणून

पितृ पक्ष (Pitru paksha 2022 ) भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येपर्यंत असतो.

पितृ पक्ष (Pitru paksha 2022 ) भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येपर्यंत असतो. हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूप महत्त्व आहे. पितृ पक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात.पितृपक्षात पितरांसाठी श्राद्ध आणि तर्पण केले जाते. या दृष्टीने पितरांशी संबंधित कार्य केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पितरांना मोक्ष प्राप्त होतो. यावर्षी पितृ पक्ष १० सप्टेंबर २०२२ पासून सुरू होईल आणि १५ सप्टेंबर २०२२ रोजी संपेल. पितृपक्षाबद्दल काही सविस्तर माहिती जाणून घ्या

१. पक्ष भाद्रपद मासातील कृष्णपक्ष
२. पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व
पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास झाल्याने वाईटशक्तींनी त्यांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते. श्राद्धामुळे पितरांचे रक्षण होते, त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते. पितृपक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता, ते वर्षभर तृप्त रहातात.

पितृपक्ष (महालय पक्ष) व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते.

३. पितृपक्षात श्राद्ध का करावे ?
अ) पितृपंधरवड्यामध्ये वातावरणात तिर्यक लहरींचे (रज-तमात्मक लहरींचे) आणि यमलहरींचे आधिक्य असल्याने पितृपक्षात श्राद्ध केल्याने रज-तमात्मक कोषांशी निगडित असणार्या पितरांना पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणे सोपे जाते; म्हणून हिंदु धर्मात सांगितलेले विधीकर्म हे त्या त्या काळी करणे जास्त श्रेयस्कर असते.
आ). पितृपक्ष हे हिंदु धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून आमावास्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे.
इ). पितृपक्षाच्या काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात. यात एक दिवस श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात.
ई). पितृपक्षात आपल्या सर्व पितरांसाठी श्राद्ध घातल्याने त्यांच्या वासना, इच्छा तृप्त होऊन त्यांना गती मिळते.

४. पितृपक्षात दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व
दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासांपासून रक्षण होण्यास साहाय्य होत असल्याने पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचा न्यूनतम ७२ माळा नामजप करावा.

५. तिथी श्राद्धाचे नाव कोणासाठी ?
१. चतुर्थी किंवा पंचमी (भरणी नक्षत्रन असतांना) भरणी मृत झालेली – व्यक्ती
२. नवमी अविधवा नवमी अहेवपणी मृत झालेली स्त्री श्राद्ध न करता सवाष्णीला भोजनही घालतात
३. त्रयोदशी बाळाभोळानी तेरस (सौराष्ट्रातील नाव) लहान मुले काकबळी
४. चतुर्दशी घातचतुर्दशी अपघातात मृत्यू पावलेले, शस्त्राने मारले गेलेल,

६. श्राद्ध करण्याची पद्धत
अ. ‘भाद्रपद प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे; पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे.
हे श्राद्ध पितृत्रयी – पिता, पितामह (आजोबा), प्रपितामह (पणजोबा);
मातृत्रयी – माता, पितामही, प्रपितामही; सापत्नमाता,
मातामह (आईचे वडील), मातृपितामह, मातृप्रपितामह,
मातामही (आईची आई), मातृपितामही, मातृप्रपितामही,
पत्नी, पुत्र, कन्या, पितृव्य (काका), मातुल (मामा), बंधू, आत्या, मावशी, बहीण, जावई, सासरा, आचार्य, उपाध्याय, गुरु, मित्र, शिष्य या सर्वांच्या प्रीत्यर्थ करायचे असते. जे कोणी जिवंत असतील, ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात.
आ. देवांच्या स्थानी (जागी) धूरिलोचन संज्ञक विश्वेदेव घ्यावे.
इ. शक्य असल्यास देवांकरता दोन, चार पार्वणांना (मातृत्रयी, पितृत्रयी, मातामहत्रयी आणि मातामहीत्रयी) प्रत्येकी तीन आणि पत्नी इत्यादी एकोद्दिष्ट गणाला प्रत्येकी एक असे ब्राह्मण बोलवावेत. एवढे शक्य नसेल, तर देवांकरता एक, चार पार्वणांकरता चार आणि सर्व एकोद्दिष्ट गणाला एक, असे सहा ब्राह्मण
सांगावेत.
ई. योग्य तिथीवर महालय श्राद्ध करणे अशक्य झाल्यास पुढे ‘यावद्वृश्चिकदर्शनम्’ म्हणजे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत ते कोणत्याही योग्य तिथीला केले, तरी चालते.’
उ. पितृपक्षातील विविध तिथींना विशिष्ट व्यक्तींसाठी करावयाची श्राद्धे खाली सारणीत दिली आहेत.

टीप :- पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्यास गयेला जाऊन श्राद्ध केल्यास जेवढे फळ मिळते, तेवढे फळ मिळते. शास्त्रानुसार भरणी श्राद्ध हे वर्षश्राद्धानंतर करावे.

वर्षश्राद्धापूर्वी सपिंडीकरण केले जाते. त्यानंतर भरणी श्राद्ध केल्यास मृताच्या आत्म्याची प्रेतयोनीतून सुटका होण्यास साहाय्य होते. हे श्राद्ध प्रत्येक पितृपक्षात करावे. काळानुरूप प्रचलित झालेल्या पद्धतीनुसार व्यक्ती मृत झाल्यानंतर १२ व्या दिवशीच सपिंडीकरण केले जाते. त्यामुळे काही शास्त्रकारांच्या मते व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या वर्षी येणार्या पितृपक्षामध्येच भरणी श्राद्ध केले, तरी चालते.

७. इतरही मघादी श्राद्धे – भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही मघादी श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी महालयात न करता दुसर्या वर्षापासून करावीत.

८. नित्य तर्पण – नित्य तर्पणातही मृत व्यक्तीचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करावा. पहिल्या वर्षी करू नये.’

९. पक्षपंधरवडा (पितृपक्ष) सर्व कर्मास निषिद्ध का असतो ?
अ. पक्षपंधरवडा कालावधी भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून महालयास प्रारंभ होतो; पण भाद्रपद अमावास्येला (म्हणजेच सर्वपित्री अमावास्या)
महालयाची समाप्ती होत नाही. महालयाची समाप्ती सूर्य तुला राशीतून वृश्चिकेला गेल्यावरच होते; म्हणून महालयाचा जवळजवळ दोन मासांचा कालावधी अशुभ किंवा निषिद्ध मानावा लागेल.
आ. विवाहाच्या प्राथमिक सिद्धतेसाठी हा काळ निषिद्ध नसणे

पक्षपंधरवडा (महालय) निषिद्ध किंवा अशुभ मानण्याची मजल इतकी लांबपर्यंत गेलेली आहे की, या पंधरवड्यात ‘विवाह’ हा शब्दही उच्चारला जात नाही. मग विवाहविषयक बोलणी करणे, स्थळांना भेटी देणे, विवाह निश्चिती इत्यादी गोष्टी पुष्कळ दूर रहातात. प्राथमिक सिद्धता इत्यादी कोणत्याही गोष्टींसाठी पक्षपंधरवडा आड येत नाही. पक्षपंधरवड्याचा दूरान्वयाने संबंध पिशाचे इत्यादी पापयोनींशी लावला जातो; पण परिस्थिती अगदी उलट असते. निधन झालेल्या व्यक्तीची प्रेतत्वनिवृत्ती वर्षभर होत नसल्यामुळे निधनोत्तर येणार्या पहिल्या महालयात त्यांना स्थान असत नाही.

१०. भरणी श्राद्ध
अ. पहिल्या वर्षी भरणी श्राद्ध केल्याने शास्त्राज्ञेचे उल्लंघन होणे पहिल्या वर्षी अब्दपूर्ती वर्षश्राद्ध होईपर्यंत मृत व्यक्तीस प्रेतत्व असते, पितृत्व नसते. पहिल्या वर्षी त्यांना महालयातील कोणत्याही श्राद्धांचा अधिकार नसतो. असे असतांनाही अगदी आवर्जून पहिल्या वर्षीच भरणी श्राद्ध केले जाते, यात शास्त्राज्ञाचे उल्लंघन होते.
आ. भरणी श्राद्ध करण्याचा काल पहिल्या वर्षानंतर भरणी श्राद्ध अवश्य करावे. वास्तविक ‘ते प्रतिवर्षी करावे’, अशी शास्त्राज्ञा आहे; पण दुराग्रहाने ते एकदाच करणार्यांनी निदान ते पहिल्या वर्षी तरी करू नये.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यानंतर प्रथमच काँग्रेसला मिळणार मराठी पक्षाध्यक्ष? सोनिया गांधींनी घेणार मोठा निर्णय

मुंबईच्या प्रभादेवीमध्ये भीषण आग

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss