Navratri 2022 : नवरात्र हा सण का साजरा केला जातो ?

नवरात्र हा सण सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्याच्या दरम्यान येतो.

Navratri 2022 :  नवरात्र हा सण का साजरा केला जातो ?

नवरात्र हा सण सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्याच्या दरम्यान येतो. नवरात्र हा हिंदू धर्मातील स्त्रियांचा प्रमुख उत्सव म्हणून ओळखला जातो. हा सण पूर्ण भारतात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने केला जातो. नवरात्र हा नऊ रात्रींचा उत्सव असतो, ज्यात सर्व स्त्रिया देवीच्या नऊ वेगवेगळया रुपांचे पूजन करीत असतात. नवरात्रीमध्ये देवी समोर अखंड दिवा लावला जातो. देवीची नऊ दिवस भक्तिभावाने पूजा केल्याने ती आनंदी होते आणि भक्तांचे सर्व त्रास दूर करते. यावेळी नवरात्री २६ सप्टेंबर २०२२ रोजी सुरु होत आहे.

हे ही वाचा : खार येथील धर्मा ऑफिसमध्ये अयान मुखर्जीसोबत रणबीर आणि आलिया

 

नवरात्रीचे महत्व –

नवरात्र हा सण भारतामध्ये तसेच अनेक देशातही बनवला जातो. आपल्या हिंदु संस्कृतीत धर्माला महत्व आहे. प्रथा, परंपरा, सण अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने आजही साजरे होतांना दिसतात. नवरात्र हा तर भारतातील अतिशय पवित्र आणि महत्वाचा उत्सव आहे, संपुर्ण नउ दिवस देवीची पुजा, अर्चा, आराधना करत मंगलमय अशा वातावरणात भक्तजन देवीची अनेक रूपं या नउ दिवसात पुजतात. हिंदु धर्मातील महत्वाचा उत्सव म्हणुन या सणाकडे बघितले जाते. तसेच हिंदू संस्कृतीतील नवरात्र हा उत्सव देवी दुर्गेला समर्पित असा उत्सव आहे. संस्कृत मध्ये नवरात्री या शब्दाचा अर्थ नऊ रात्री असा होतो. भारतात आणि नेपाळ मधे साजरा करण्यात येतो. एका वर्षात ५ प्रकारचे नवरात्र येतात त्यात शारदिय नवरात्र सर्वात प्रसिध्द आहे. याच ठिकाणी नवरात्राचा अर्थ शारदिय नवरात्र असाच असतो.

 

मडक्यामध्ये धान्य पेरले जाते. त्यावर अखंड दीप लावला जातो. रोज फुलांची माळ सकाळ-संध्याकाळ आरती ही केली जाते. घरोघरी किंवा सार्वजनिक मंडळात घटस्थापना होत असते. प्रत्येक घराची स्थापना करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि प्रत्येक ठिकाणी देवीची वेगवेगळी रूपे व नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देवीच्या मूर्तींची स्थापना केली जाते. देवीच्या घटस्थापनेच्या वेळी ब्राह्मणाला बोलावून त्याच्याकडून ही घटस्थापना करून घेतली जाते. नवमीच्या दिवशी होमहवन असते. दहाव्या दिवशी दसरा हा सण बनवण्यात येतो.

हे ही वाचा :

कोरोना पुन्हा आला, गेल्या २४ तासांत देशात हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

 

Exit mobile version