Datta Jayanti 2022 : श्री दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा दत्त जयंती ७ डिसेंबर २०२२ रोजी म्हणजेच बुधवारी साजरी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा चंद्र कृत्तिका-रोहिणी नक्षत्रात आणि वृषभ राशीत सिद्ध आणि सर्वार्थसिद्धी योगात श्री दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे.भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे अवतार मानले जातात. त्रिमुखी म्हणजेच ३ चेहरे आणि ६ भूजा म्हणजेच हात असलेल्या श्री दत्तात्रेय भगवान यांच्यात तिन्ही देवतांची शक्ती सामावली आहे असे म्हणतात. ७ डिसेंबरला सकाळी ८ वाजून ०२ मिनिटांला मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रारंभ होत आहे. तर ८ डिसेंबरला सकाळी ९ वाजून ३८ मिनिटांला पौर्णिमा समाप्त होणार आहे.
- दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! आपणा सर्वांना हा दिवस अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो ही सदिच्छा!
- ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरू दिसले – दत्तगुरू जयंतीच्या शुभेच्छा!
- गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः - दत्त दत्त ऐसे लागले ध्यान,
हरपले मन झाले उन्मन
मी तूपणाची झाली बोळवण,
एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! - !! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व
आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक
मंगलमय शुभेच्छा!! - आता नको दिव्यदृष्टी, आता नको ही जडसृष्टी
फक्त असावी आपल्यावर, आपल्या सद्गुरुंची कृपादृष्टी - दत्तगुरुंचे नाम स्मरा हो, दत्तगुरुंचे भजन करा
हे नामामृत भवभयहारक, असंहारक त्रिभुवनतारक
दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! - ज्याच्या मनी गुरु विचार
तो नसे कधी लाचार।
ज्याच्या अंगी गुरु भक्ती
त्याला नाही कशाची भीती|
ज्याच्या हृदयात गुरु मुर्ती
त्याची होई जगभरात किर्ती।
जो करेल गुरु ची पूजा
त्याच्या आयुष्यातील दु:ख होईल वजा
श्री दत्त जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा! - दत्तकथा वसे कानी
दत्तमूर्ती ध्यानीमनी
दत्तालागी अलिंगना कर
समर्थ हे जाणा
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! - आत्मसुखाचा मोक्ष लुटाया,
अमोल ठेवा हाती धरा
दत्तचरण माहेर सुखाचे,
दत्तभजन भोजन मोक्षाचे
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
हे ही वाचा :
Datta Jayanti 2022 दत्तजयंतीनिम्मित जाणून घ्या भगवान दत्ताची कथा
Datta Jayanti 2022 तुम्हाला माहित आहे का त्रिमुर्ती प्रभु दत्तात्रेय उदयास कसे आले ?
Datta Jayanti 2022 दत्त जयंती माहिती