spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Janmashtami च्या दिवशी तुमच्या बाळाचा जन्म झाला?, बांळासाठी कृष्णांची खास नावे एकदा पहाच!

घरात बाळाची चाहूल लागली, की गर्भवती मातेचे डोहाळे पुरवले जातात. तिला काय खावंसं वाटतंय, त्यावरूनही मुलगा किंवा मुलगी चा अंदाज बांधला जातो. सातव्या महिन्यात तिचा कौतुक सोहळा म्हणून ओटी भरणं केलं जात.

घरात बाळाची चाहूल लागली, की गर्भवती मातेचे डोहाळे पुरवले जातात. तिला काय खावंसं वाटतंय, त्यावरूनही मुलगा किंवा मुलगी चा अंदाज बांधला जातो. सातव्या महिन्यात तिचा कौतुक सोहळा म्हणून ओटी भरणं केलं जात. त्यातही तिला आवडण्याऱ्या पदार्थाची रेलचेल असते. आईसाठी मुलगा-मुलगी हे एक समानच असतात. त्यामुळे ती फक्त सगळ्यांचा आनंद घेत असते. तिला मुलगा-मुलगी असं काही नसतं. त्यामुळे मुलगा झाला तर काय नावं ठेवावं आणि मुलगी झालं तर काय नाव ठेवावं याचा विचार सगळेच करत असतात.

श्रीकृष्ण हे अनेकांचे आराध्य दैवत आहे. प्रेम आणि कृष्ण या दोन्हीचे एकच समीकरण मानले जाते. यावर्षी कृष्ण जन्माष्टमी ६ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. श्रीकृष्णाची अशी अनेक नाव आहेत. या नावाबद्दल आपल्याला माहित ही नाही. हल्ली मुलाचा जन्म होण्यापासूनच या नावाचा विचार केला जातो. आपले बाळ ही कृष्णासारखेच पराक्रमी व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते.तुमच्या घरातही लहानशा श्रीकृष्णाचे आगमन झाले असेल किंवा तुम्हाला श्रीकृष्णाच्या नावावरून आपल्या मुलाचे नाव ठेवायचे असेल तर या नावाचा विचार नक्की करा.

आरिव – श्री कृष्ण हे अत्यंत हुशार देव म्हणून प्रसिद्ध होते. महाभारत घडविण्यात कृष्णाचा मोठा हात हा पुराणानुसार मानला जातो. हुशारीचा देवता असा आरीव या नावाचा अर्थ आहे. ज्ञान आणि न्यायाचा राजा असा ही या नावाचा अर्थ होतो.

अच्युत – या नावाचा अर्थ असा आहे कि, ज्याने कधीही चूक केली नाही. तुमच्या मुलाचे आद्याक्षर अ आले असेल आणि तुम्हाला कृष्णाच्या अर्थावरून नाव ठेवायचे असेल तर हे नाव तुम्ही निवडू शकता.

अनिरुद्ध – या नावाचा अर्थ ज्याचा कधी ही पराजय होऊ शकत नाही. ज्याला कोणी ही हरवू शकत नाही.

अप्रमेय – अनंत किंवा अगदी भगवान कृष्णाप्रमाणे हा या नावाचा अर्थ आहे.

ब्रिज – हे नाव श्रीकृष्णाचे निवासस्थानवरून आहे. तुमच्या मुलाचे आद्याक्षर ‘ब’ आले असेल आणि तुम्हाला कृष्णाच्या अर्थावरून नाव ठेवायचे असेल तर हे नाव तुम्ही निवडू शकता.

गिरिवर – श्री कृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला म्हणून त्याला गिरिवर असेही या नावाचा अर्थ आहे. गिरिवरचा अर्थ आहे ज्याने गोवर्धन पर्वत उचलला. आद्याक्षर ‘ग’ आले असेल आणि तुम्हाला कृष्णाच्या अर्थावरून नाव ठेवायचे असेल तर हे नाव तुम्ही निवडू शकता.

इशान – इशान हे श्री कृष्णाचेच एक नाव आहे.

धर्माध्यक्ष – धर्माध्यक्ष या नावाचा अर्थ म्हणजे धर्माचा स्वामी हा आहे.

ज्योतिरात्य – ज्योतिरात्य म्हणजे जो सूर्यासारखा चमकतो.

मदन – मदन या नावाचा अर्थ आहे कि, प्रेमाचे प्रतीक हा आहे.

मुकुंद – मुकुंद नावाचा अर्थ असा की, जो स्वातंत्र्य देतो.

मधुसूदन – श्रीकृष्णांनी अनेक राक्षराचा वध केला. मधुसूदन या नावाचा अर्थ असा कि राक्षसांचा वध करणारा.

मयूर – श्री कृष्ण आपल्या डोक्यावर मोराचे पीस घालायचे. मयूर नावाचा अर्थ असा की, जो आपल्या मुकुटावर मोराची पिसे घालतो.

पार्थसारथी – महाभारताच्या युद्धात कृष्ण हे अर्जुनाचे सारथी होते. म्हणून तेपार्थ सारथी म्हणून ही ओळखत होते.

रविलोचन – रविलोचन म्हणजे सूर्यासारखे डोळे असलेले.

सहस्रजित – सहस्रजित या नावाचा अर्थ असा कि, जो हजारांवर विजय मिळवतो.

त्रिवेश – त्रिवेश म्हणजे जो तीनही वेद जाणतो.

त्रिविक्रम – त्रिविक्रम म्हणजे तिन्ही जगाचा विजेता.

विश्वकर्मा – विश्वकर्मा म्हणजे विश्वाचा निर्माता हा आहे. आपण आपल्या मुलासाठी सुंदर नाव शोधत असल्यास हे उत्तम नाव आहे.

 

हे ही वाचा: 

Janmashtami 2023, कृष्ण जन्माष्टमी कधी साजरी करायची यामध्ये गोंधळ होतो? जाणून घ्या कृष्ण जन्माष्टमी कधी साजरी करायची…

Janmashtami 2023, यंदा बाळगोपाळाचा पाळणा सजवा अनोख्या पद्धतीने, ‘या’ टिप्स करा फॉलो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss