spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

घरच्या घरी बनवा हॉटेल सारखं चविष्ट Paneer Butter Masala

पनीरच्या कोणत्याही रेसिपीचे नाव ऐकताच छोट्यांसह मोठ्यांच्या तोंडात पाणी येऊ लागते. तुम्हाला घरी हाॅटेलसारखं पनीर बटर मसाला बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

Paneer Butter Masala Recipe : पनीरच्या कोणत्याही रेसिपीचे नाव ऐकताच छोट्यांसह मोठ्यांच्या तोंडात पाणी येऊ लागते. तुम्हाला घरी हाॅटेलसारखं पनीर बटर मसाला बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. शाकाहारी लोकांसाठी खूपच चांगली डिश आहे. पनीर हा एक असा पदार्थ आहे ज्याशिवाय भारतीय बुफे कधीही पूर्ण होऊ शकत नाही. तर चला पनीर बटर मसाल्याची रेसिपी (Paneer Butter Masala Recipe In Marathi) जाणून घेऊ या…

साहित्य :

२५० ग्रॅम पनीर
३ मध्यम आकाराचे टोमॅटो
१-२ हिरव्या मिरच्या
१ इंच आल्याचा तुकडा
१/२ कप क्रीम
२ चमचे बटर
२ चमचे कोथिंबीर
१/४ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद पावडर
१ टीस्पून धणे पूड
१ टीस्पून कोरडी मेथीची पाने
चवीनुसार मीठ
१/४ टीस्पून गरम मसाला
१/४ टीस्पून जिरे पूड

कृती :

  • टोमॅटो, हिरवी मिरची आणि आलं स्वच्छ धुवून घ्या.
  • टोमॅटो, हिरव्या मिरच्या व्यवस्थित चिरून घ्या. आलं सोलून आणि बारीक कापून घ्या.
  • हे सर्व साहित्य मिक्सर भांड्यात काढून घ्या. बारीक करून बारीक पेस्ट बनवा.
  • आता कढईत १ चमचा बटर घाला. बटर वितळल्यावर जिरे पावडर, धणे पावडर, हळद पावडर घालून थोडावेळ परता.
  • तसेच टोमॅटो-हिरवी मिरची-आलं पेस्ट, लाल तिखट आणि सुक्या मेथीची पाने घाला. हा मसाला व्यवस्थित परता.
  • आता या मसाल्यात क्रीम, गरम मसाला, कोथिंबीर आणि मीठही घाला.
  • आता या ग्रेव्हीमध्ये १/२ कप पाणी घाला आणि पुन्हा उकळी येईपर्यंत शिजवा.
  • ग्रेव्ही उकळू लागल्यावर त्यात पनीरचे तुकडे घाला. पॅन झाकून ठेवा आणि भाजी ३ ते ४ मिनिटं मंद आचेवर शिजवा. ३ ते ४ मिनिटांनंतर त्यावर पुन्हा लोणी घाला.
  • तुमचं रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला तयार आहे. आता गरमागरम चपाती, पराठा, नान किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.

हे ही वाचा : 

आंबट गोड अननस खाण्याचे फायदे माहिती आहेत का ?

Health Tips : मनुक्यांचं पाणी प्या अन् आजारापासून रहा दूर

बेडरूम सजवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्सचा करा वापर

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss