spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

श्रावणात उपवासाच्या दिवसांमध्ये सैंधव मिठाव्यतिरिक्त इतरही मिठाचा समावेश तुम्ही करू शकता, जाणून घ्या सविस्तर…

आषाढ महिना संपताच म्हणजेच जुलैच्या अखेरीस श्रावण महिना सुरु होतो आणि तो सणांचा राजा व पवित्र मानला जातो. श्रावणी सोमवार हे अत्यंत विशेष मानले जातात. यामध्ये विविध सणांचा समावेश असतो. प्रत्येक सणाचे एक वेगळ महत्व आहे. तसेच श्रावणात वेगवेगळ्या धर्मांचे लोक त्यांच्या पद्धतीने विविध व्रत किंवा उपवास करीत असतात.

श्रावणात नागपंचमी, कृष्णजन्माष्टमी, बैलपोळा, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा (Nag Panchami, Krishna Janmashtami, bailPolla, Raksha Bandhan, Narali Poornima) असे अनेक सण समारंभ साजरे केले जातात आणि प्रत्येकजण स्वतःच्या रूढी परंपरांना अनुसरून व्रतवैकल्य करत असतात. त्यामध्ये ते अनेक पदार्थांना आपल्या आहारातून वर्ज करतात. हिंदू संस्कृतीत उपवासांचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. पांढऱ्या मिठाचा समावेश आपण हिंदू संस्कृतीत करत नाहीत. फास्टिंग फूड मध्ये पांढऱ्या मिठाचे सेवन करु शकत नाही. त्याव्यतिरिक्त कोणते मिठाचे प्रकार आपण उपवासाच्या दिवशी सेवन करू शकतो हे पाहू.

सैंधव मीठ –

सैंधव मीठ हे साध्या मिठाच्या तुलनेत काही कमी प्रमाणात शुद्ध केले जाते. त्यामुळे पर्यायी त्यामधील उपयुक्त खनिजे त्यातच राहतात. तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ केली जात नाही. या प्रकारच्या मिठाला उपवासाच्या दिवसांमध्ये जास्तच महत्व असते व हे जास्त प्रमाणात वापरले जाते. या मिठाचा प्रकार पंजाबच्या प्रदेशात आढळतो. याला विशिष्ट गुलाबी रंग असतो. यात बऱ्याच पोषक घटकांचा समावेश असतो. सैंधव मिठात झिंक, लोह, मॅग्नेशियम (Zinc, Iron, Magnesium) अशा अनेक पौष्टिक पदार्थ आढळतात.

समुद्री मीठ –

हे मीठ सर्वाधिक नैसर्गिक पद्धतीचे असते. जे केवळ समुद्राच्या बाष्पीभवन झालेल्या पाण्यातून मिळते. उपवासाच्या वेळी अतिशय शद्ध पद्धतीचे हे मीठ आपण आहारात ठेवू शकतो. हे मीठ आपली पचन प्रक्रिया सुधारण्यास आणि त्वचेचे आरोग्य सुद्धा सुधारण्यास मदत करते.

काळे मीठ –

काळ्या मिठाचा समावेश आपण बरेचजण आपल्या आहारात करत असतो आणि ते मोठ्या प्रमाणात वापरले जाते. चाट पदार्थांमधे त्या प्रकारच्या मिठाचा फार वापर केला जातो. त्याचप्रमाणे आपण सँडविच, सलाड, कोशिंबीर, चटण्या अश्या पदार्थांमध्येदेखील केला जातो. काळे मीठ खाल्ल्याने आपल्या पचनक्रियेवर परिणाम होऊन ती सुधारण्यास मदत होते.

खनिज मीठ –

शरीरासाठी उपयुक्त अशी खनिजे यात मोठ्या प्रमाणात आढळतात आणि ती सर्वात उपयुक्त असतात. एवढेच नव्हे तर ते सर्व रासायनिक प्रक्रियांपासून मुक्त आहे. हे मीठ प्रामुख्याने समुद्राच्या तळाशी सापडते. हे आपण कोणत्याही पदार्थात किंवा पेयात वापरू शकतो.

Latest Posts

Don't Miss