उपवासाठी खास ३ प्रकारचे पदार्थ; जाणून घ्या रेसिपी…

उपवासाठी खास ३ प्रकारचे पदार्थ; जाणून घ्या रेसिपी…

उपवासासाठी नक्की कोणता पदार्थ बनवायचा हा प्रश्न नेहमी तुम्हाला पडत असतो . त्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो . उपवासामध्ये आपण नेहमी साबुदाण्याची खीर , बटाटयाची खीर , वरीचा भात , वरीची खीर असे पदार्थ बनवत असतो . आणि तुम्हाला तेच पदार्थ खायाला कंटाळा येत असेल . तर आज आम्ही तुम्हाला उपवासासाठी खास ३ वेगवेगळया प्रकारचे पदार्थ दाखवणार आहोत . तसेच आपण उपवासासाठी सफरचंदाचा हलवा, रताळ्याचा हलवा , बटाट्याचा हलवा , तर जाणून रेसिपी पुढील प्रमाणे .

हे ही वाचा : लहानमुलांसाठी स्पेशल चहा सोबत बटाटे चिप्स

 

उपवासासाठी सफरचंदाचा हलवा बनवण्याचे साहित्य –

सफरचंदा पासून तुम्ही उपवासासाठी हलवा देखील बनवू शकता .

 

साहित्य –

१ सफरचंद
१/४ साखर
१/२ तूप
१/२ चमचे वेलची पूड
काजू

कृती –

सफरचंदाची साल सोलून मिक्सकर मध्ये वाटून घ्या . त्यानंतर कढईत तूप घालून त्यामध्ये काजू चांगले भाजून घ्या. आता सफरचंद पॅन मध्ये घालून चांगले शिजून घ्या . शिजून झाल्यानंतर त्यामध्ये साखर आणि खवा मिक्सकरून घ्या . परत एकदा शिजून घ्या शिजल्यानंतर त्यामध्ये काजू वेलचीपूड घालून एकजीव करून घ्या .

 

रताळ्याचा हलवा –

 

साहित्य –

रताळे, पाव किलो खवा, एक वाटी ओले खोबरे, एक वाटी साखर, पाव वाटी काजूची पावडर, तीन चमचे साजूक तूप, वेलची पावडर सजवण्यासाठी बेदाणे, मनुका.

कृती –

रताळी उकडून, त्याची सालं काढून घेणे . ती चांगली बारीक करून घ्यावी . नंतर साजूक तूप पॅन मध्ये घालणे . आणि त्यामध्ये बारीक केलेली रताळी आणि खोबरे साखर घालून एकजीव करून घेणे . हे मिश्रण सतत परतावे . नंतर त्यामध्ये काजूची पावडर आणि खवा , वेलची पूड घालून परत एकदा परतून घ्यावे . आणि वरून बेदाणे आणि मनुके घालून सजून घेणे .

बटाट्याचा हलवा –

यासाठी बटाटे उकळून नंतर सोलून चांगले मॅश करा. आता पॅनमध्ये १ – २ चमचे तूप टाका आणि नंतर त्यात बटाटे घाला. आता बटाटे हलके तळून घ्या आणि नंतर साखर आणि वेलची पूड घाला. बटाटे हलके तपकिरी होईपर्यंत तळा. आता त्यावर किसलेले खोबरे आणि बेदाणे टाका.

 

हे ही वाचा :

उरलेल्या भातापासून बनवा हॉटेल सारखा फ्राईड राईस

 

 

 

Exit mobile version