पावसाळ्यात पिऊन पहावेत असे 5 प्रकारचे आरोग्यदायी चहा

पावसाळ्यात पिऊन पहावेत असे 5 प्रकारचे आरोग्यदायी चहा

अखेर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली

पावसाळा हा फक्त ऋतू नाहीये तर अनेकांना आणि खासकरून चोखंदळ खवय्यांसाठी त्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारा सोहळा आहे. आता पावसाळा म्हटलं की भजी, वडापाव, मिसळ, कांदेपोहे, टोस्ट सँडविच अशा एक न अनेक पदार्थांची नाव आपल्या तोंडी येतात. पण, या पदार्थांना अधिक चविष्ट बनवणारी एखादी गोष्ट असेल तर तो आहे ‘चहा’ पावसाळ्यात अगदी साधा शेव किंवा बिस्कीट खावं म्हटलं तरी ते चहाशिवाय अपूर्ण वाटतात. म्हणूनच आपणसुद्धा आज माहिती जाणून घेणार आहोत अशाच काही चहाच्या विविध प्रकारांबाबत जे पावसाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील

आल्याचा चहा: आल्याचा चहा हा पावसाळ्यात सर्वांच्या यादीत अगदी सर्वोच्च स्थानी असणारा चहा आहे. हा चहा सामान्य सर्दीच्या उपचारांमध्ये तसेच घसा साफ करण्यास आणि ऍलर्जीच्या उपचारांमध्ये मदत करतो. त्याचबरोबर, आल्याचा चहा रक्ताभिसरण सुधारून आणि अन्नाचे रक्तात योग्य शोषण करण्यास आणि पचन सुनिश्चित करून अपचनाशी सामना करण्यास मदत करतो.

कॅमोमाइल चहा : प्राचीन इजिप्शियन काळात मोठ्य आजारांच्या उपचारांसाठी या चहाचा वापर व्हायचा. असे म्हटले जाते की हा चहात अँटी – इफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत, जे विशेषत: पावसाळ्यात फायदेशीर ठरतात, कारण हंगामात सर्दी, फ्लू, व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. तसेच थकवा आणि निद्रानाशावर हा चहा एक उत्तम उपचार आहे.

ग्रीन टी : आपलं आरोग्य सुधारावं म्हणून नानाप्रकारचे उद्योग करणाऱ्यांच्या ओळखीचा चहा. पण, हा ग्रीन टी, त्यात असणाऱ्या अँटीऑक्साईडन्ट्समुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतो आणि यामुळे पावसाळ्यातील अनेक रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो.

तुळशीचा चहा : भारतीय आयुर्वेदात तुळशीला फार पूर्वीपासून खुप महत्त्व दिले जाते. तुळशीपासून बनविलेले चहा हा डोकेदुखी, सर्दी, खोकला, मधुमेह, तणाव, चिंता आणि नैराश्यावर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. त्याशिवाय, रोग प्रतिकारशक्ती, पचन आणि त्वचा रोगाशी लढण्यास मदत करते. तसेच तुळशीचा अँटी – इन्फ्लामेटरी गुणधर्म शरीराच्या डीटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतो.

अखेर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली

Exit mobile version