दहीवडे बनवण्याची साधी आणि सोपी रेसिपी

दहीवडे हा उत्तर भारतीय पदार्थ असून त्यात तिखट, गोड , आणि आंबट यामुळे हा पदार्थ ओळखला जातो.

दहीवडे बनवण्याची साधी आणि सोपी रेसिपी

दहीवडे हा उत्तर भारतीय पदार्थ असून त्यात तिखट, गोड , आणि आंबट यामुळे हा पदार्थ ओळखला जातो. दही वड्यासाठी जो वडा वापरला जातो तो उडदाच्या डाळीपासून बनवला जातो. तसेच दहीवडे सर्वांची आवडती डिश आहे. आपण अनेकवेळा कार्यक्रमात दहीवड्यांचा आस्वाद हा घेतो. दहीवडे प्रसंगी आणि उत्सवासाठी बनवले जातात. तसेच काही लोकांना दहीवड्यांचे नाव घेतल्यास जिभेला पाणी सुटते. तर आज आपण घरच्याघरी लुसलुशीत आणि मऊ दहीवडे कसे बनवता येतील ते आज आपण जाणून घेऊया.

हे ही वाचा :डोळ्याखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी खास घरगुती उपाय

 

रेसिपी –

 

साहित्य –

दही

उडदाची डाळ ( अर्धा कप )

चिंचेची चटणी

हिरवी चटणी

लालतिखट

चाट मसाला

जिरे पूड

मीठ

साखर

कृती –

सर्व प्रथम उडदाची डाळ भिजून घेणे. डाळ चांगली भिजून घेतली कि ती मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे वाटून घेतल्यानंतर चांगले फेटून घेणे. फेटून झाल्यानंतर ते मिश्रण बाजूला ठेवणे त्यानंतर एक बाउलमध्ये दही आणि साखर मीठ घालून मिक्सकरून घेणे. त्यानंतर तेल चांगले गरम करून घेणे. तेल गरम झाल्यानंतर तयार केलेल्या डाळीच्या मिश्रणाचे गोळे करून तेलामध्ये चांगले तळून घेणे. चांगले तळून झाल्यानंतर एका प्लेटीमध्ये काढून घेणे. मग ते वडे पाण्यात टाकून १० मिनिटे ठेवणे आणि मग ते वडे कडून घेऊन त्यातलं पाणी काडून घेणे पाणी काडून झाल्यानंतर ते वडे दही मध्ये घालून घेणे आणि वरून चिंचेची चटणी , हिरवी चटणी , लालतिखट, चाट मसाला , जिरे पूड घालून घेणे आणि लुसलुशीत आणि मऊ दही वडे खाण्यासाठी तयार आहे.

हे ही वाचा :

राशी भविष्य १४ सप्टेंबर २०२२, मिथुन राशीच्या लोकांनी पारंपरिक उद्योग व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करा

 

Exit mobile version