spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आज तुमच्यासाठी स्पेशल मखान्याचा हलवा

मखाना म्हणजे पॉपकॉर्नसारखा असणारा पदार्थ. तसेच मखाना हा पदार्थ बहुतेक लोकांना माहित नाही. मखान्याचे सेवन केल्याने आरोग्यावर त्याचे खूप फायदे चांगले परिणाम होतात. काहीठिकाणी मखाना कमळाची बी या नावाने ओळखली जातो. ज्यांना सारखी भूक लागते त्यांनी मखाना खावा. मखाना खाल्यास भूकेवर नियंत्रण राहते, मखान्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत राहतात. उच्चरक्तदाबाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी मखान्याचे सेवन केले पाहिजे कारण नियमितपणे याचे सेवन केल्याने रक्त वाढीस मदत होते आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी मखाना खूप उपयुक्त आहे. तर आज आम्ही तुम्हाला याच मखान्याचा हलवा कसा बनवायचा ते दाखवणार आहोत.

हे ही वाचा : संध्याकाळच्या चहा सोबत बनवा स्पेशल पालक चाट

 

मखाना बनवण्याची रेसिपी –

 

मखाना बनवण्याचे साहित्य –

३ कप मखना

२ चमचे बारीक चिरलेले बदाम

१०-१५ काजू

१ कप भिजवलेले मनुके

१ वाटी तूप

चवीनुसार साखर

१ कप दूध

मखाना बनवण्याची कृती –

सर्व प्रथम बेदाणे , काजू , बदाम , मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

त्यानंतर पॅनमध्ये तूप घाला आणि तुपामध्ये मखाना चांगला परतून घ्या.

मखाना परतून झाल्यानंतर तो एका भांड्यात काढून घ्या.

त्यानंतर मखाना मिक्सकरमध्ये बारीक वाटून घ्या.

आता एका कढईत १ चमचा तूप घाला आणि ड्रायफ्रुट्स पेस्ट परतून घ्या.

आता ग्राउंड मखना वर ठेवा आणि नीट ढवळून घ्या.

यानंतर या मिश्रणात साखर घालून ते कोरडे होई पर्यंत शिजवून घ्या.

हे ही वाचा : 

उपवासाठी खास ३ प्रकारचे पदार्थ; जाणून घ्या रेसिपी…

 

Latest Posts

Don't Miss