नवरात्रीच्या उपवासासाठी खास बटाटयाची भाजी

नवरात्रीच्या उपवासासाठी खास बटाटयाची भाजी

नवरात्री मध्ये उपवासा कोणते पदार्थ करायचे हा प्रश्न पडतो. तसेच नवरात्री म्हटल्यावर गरबा , दांडिया आणि उपवासाचे पदार्थ डोळ्यांसमोर येतात. तर अशा वेळी पौष्टिकतत्त्वांनी भरलेल्या बटाट्याची भाजी खाणे उपयुक्त ठरते. बटाट्यामध्ये सोडा, आणि व्हिटॅमिन ए आणि डी परिपुर्ण प्रमाणात असते. आपण उपवासासाठी अनेक पदार्थ बनवतो आणि तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तर तुम्ही उपवासासाठी बटाट्याची भाजी किंवा बटाटा शिजवून तुम्ही मीठ घालून खाऊ शकता. बटाटयाच्या साली मध्ये प्रोटीन आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात बटाटे खान खरं तर तुम्हाला फायदेशीर ठरते. त्यामुळे बटाटा खूप उपयुक्त आहे. बटाट्या मध्ये विटामिन सी, विटामिन बी 6,पोटॅशियम, मॅग्नेशियम,झिंक आणि फॉस्फरस आढळते. तुमची त्वचा तजेलदार राहण्यासाठी हे घटक महत्त्वाचे ठरतात.

हे ही वाचा : राजमा खाण्याचे फायदे

 

रेसिपी –

 

साहित्य –

चार बटाटे

मीठ चवीनुसार

शेंगदाचें कूट

मिरची

साखर

जिरे कडीपत्ता

कृती –

सर्व प्रथम बटाटे शिजून घेणे आणि त्याचे कापे करून घेणे. त्यानंतर पॅन मध्ये तेल गरम करून घेणे तेल चांगले गरम झाले की तेलामध्ये मिरची आणि कडीपत्ता चांगले परतून घेणे. मिरची चांगली परतून झाली की त्यामध्ये साखर घालणे त्यामध्ये वरून बटाटे घालणे आणि मीठ घालून आणि मिश्रण एकजीव करून घेणे मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदानाचे कूट घालणे आणि एकत्र करून घेणे त्यानंतर ५ मिनिटे शिजून घेणे.

हे ही वाचा :

नवरात्री मध्ये गरब्याच पारंपरिक महत्व

 

Exit mobile version