गाजर पासून बनवा चविष्ठ गाजर हलवा…

गाजर पासून बनवा चविष्ठ गाजर हलवा…

आता थंडी चालू झाली आहे. थंडी चालू झाल्यावर आपल्याला वेगवेगळे पदार्थ खायाला आवडतात. थंडी मध्ये गाजर खाण्याचे अनेक फायदे आहेत. तर आम्ही तुम्हाला गाजर पासून गाजर हलवा कसा बनवायचा ही रेसिपी सांगणार आहोत. तसेच गोड पदार्थ बहुतेक लोकांना आवडतात असे नाही. काहीजण गोड पदार्थ रात्री जेवल्यानंतर खातात, किंवा गोड पदार्थ खाऊशी वाटला तर लगेच बनवून खातात. चला तर मग जाणून घेऊया गाजर हलवा कसा बनवायचा ते सांगणार आहोत.

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी रोज एक तरी गाजर खाल्ले पाहिजे . गाजर एक कंदमूळ आहे. गाजरामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वे असतात. तसेच गाजरात व्हिटॅमिन्स, मिनरल्स अँटी ऑक्सिडंट आणि बिटा केरोटीन असतात. रोज नियमितपणे गाजर खाल्ले पाहिजे त्यामुळे शरीरास योग्य प्रमाणात पोषक तत्वे मिळतात. गाजरापासून गाजर हलवा केला जातो. तसेच गाजराचे अनेक फायदेही आहे. तर चला जाणून घेऊया गाजराचे फायदे.

 

गाजर हलवा बनवण्याचे साहित्य –

एक किलो गाजर, एक लिटर दूध, १/४ कप मावा, २ कप साखर, ३ चमचे साजूक तूप, बदाम, काजू, बेदाणे

कृती –

सर्व प्रथम गाजर धुवून घेणे. त्यानंतर गॅस वर कढई ठेवणे आणि त्यामध्ये तूप घालून घेणे. तूप चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये किसलेले गाजर घालून घ्या. आणि मंद आचरेवर चांगले शिजवून घ्या. गाजर चांगले शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये दूध घालून घ्या. परत एकदा शिजवून घ्या. दूध चांगले आटल्यावर त्यामध्ये मावा आणि साखर घालून चांगले परत एकदा शिजवून घ्या. आणि पाच पाच मिनिटाला ढवळत राहा. पाणी चांगले सुकल्यानंतर त्यामध्ये थोडे तूप वरून घालून घ्या. आणि परत एकदा शिजवून घ्या. चांगले शिजवून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या आणि वरून ड्रायफ्रुट घालून घ्या. खाण्यासाठी गरमागरम गाजर हलवा तयार आहे. गाजर हलवा तुम्ही कधीपण बनवू शकता.

हे ही वाचा :

कपड्याची काळजी कशी घ्यावी ? दीर्घकाळ टिकविण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

हे ही वाचा :

मेथी खाण्याचे फायदे जाणून घ्या…

 

Exit mobile version