Ashadhi Ekadashi 2023 : उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात ? बनवा उपवासाची खास फराळी भेळ

आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी, ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात.

Ashadhi Ekadashi 2023 : उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात ? बनवा उपवासाची खास फराळी भेळ

आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी, ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. आषाढी एकादशीच्या वेळी अनेक भक्तजन ,वारकरी उपवास करतात. पण अनेकदा तेच तेच उपवासाचे पदार्थ जसे की साबुदाणा खिचडी ,बटाट्याची उसळ खाऊन कंटाळा येतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी उपवासाचा एक वेगळा पदार्थ घेऊन आलो आहोत. या पदार्थाचे नाव आहे ‘उपवासी फराळी भेळ’. ही भेळ खायला जितकी टेस्टी आहे तितकीच हेल्दी सुद्धा आहे. जाणून घेऊया यासाठीचे साहित्य आणि कृती.

साहित्य –

साबुदाणाची खिचडी (Sago khichdi)
बारीक चिरेलेली काकडी (chopped cucumber)
खारे शेंगदाणे (Salted peanuts)
तळलेला बटाट्याचा किस (Fried Potato)
दही (curd)
साखर (sugar)
तळलेला साबुदाणा (Fried sago)

कृती –

उपवासी फराळी भेळ बनवण्यासाठी सर्वप्रथम साबुदाण्याची खिचडी बनवून घ्या. मग ही साबुदाणा खिचडी (Sago khichdi) एका भांड्यात काढा आणि त्यात तळलेला साबुदाणा (Fried sago), खारे शेंगदाणे (Salted peanuts), तळलेला बटाटा किस (Fried Potato) , चवीनुसार साखर (sugar) आणि दही (curd) हे सर्व एकत्र टाकून द्या. आता या सर्व मिश्रणात बारीक काकडी कापून (chopped cucumber) टाका. त्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र चांगले मिक्स (mix) करून घ्या. आता तुमची ही फराळी भेळ तयार झाली आहे. खायला अगदी रुचकर व पटकन बनणारी ही भेळ नक्की ट्राय (try) करा आणि आपल्या प्रियजनांना खाऊ घाला.

 

हे ही वाचा:

घरच्या घरी वापरली जाणारी मोहरी ठरते Bad Cholesterol वरील रामबाण उपाय

शाहिद कपूरचा ‘ब्लडी डॅडी’ चित्रपट थिएटरमध्ये नाही दाखवणार ; निर्मात्यांनी कारण सांगितले ….

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा, सिद्धरामय्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version