Saturday, August 31, 2024

Latest Posts

Ashadhi Ekadashi 2024:आषाढी एकादशीच्या निमित्ताने बनवा खुसखुशीत साबुदाण्याचे पराठे

खिचडीव्यतिरिक्त काही वेगळे खाण्याची इच्छा असेल तर तर तुम्ही साबुदाण्याची पराठा (Sabudana Paratha) नक्की ट्राय करू शकता.

हिंदू धर्मात आषाढी एकदशीला (Ashadhi Ekadashi) खूप महत्त्व आहे. आज १७ जुलै रोजी आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकादशीचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी अनेक भक्तगण उपवास करतात आणि देवाची मनोभावे पूजा करतात. या दिवशी अनेक घरांमध्ये साबुदाण्याची खिचडी बनवली जाते. पण तुम्हाला खिचडीव्यतिरिक्त काही वेगळे खाण्याची इच्छा असेल तर तर तुम्ही साबुदाण्याची पराठा (Sabudana Paratha) नक्की ट्राय करू शकता. हा पराठा बनवायला सोपा असून चवदार देखील आहे. आषाढी एकादशीला झटपट तयार होणारे पराठे असे बनवायचे हे पाहुयात.

उपवासाचे पराठे बवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • साबुदाणा- २ वाटी 
  • उकडलेले बटाटे- २ मोठे  
  • मीठ- चवीनुसार
  • जिरे- १ चमचा 
  • भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट- २ चमचा 
  • हिरवी मिरची- ४ ते ५ 
  • साजूक तूप- २ ते ३ चमचे 

कृती:  

सर्वप्रथम उपवासाचे पराठे बनवण्यासाठी सर्वात आधी साबुदाणा मंद आचेवर भाजून घ्या. साबुदाणा थोडा थंड झाला की नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात उकडलेले बटाटे, जिरे, शेंगदाण्याचा कूट बारीक केलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण चांगले मिक्स करावे. नंतर हे मिश्रण १० ते १५ मिनिटे झाकून ठेवावे. तयार केलेल्या मिश्रणाचे लहान गोळे करून पराठे लाटून घ्या. नंतर एका गरम तव्यावर तूप लावून पराठे दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्या. अशाप्रकारे उपवासाचे साबुदाण्याचे पराठे खोबऱ्याच्या किंवा चटणीसोबत खायला चविष्ट लागतात.

 
Vishalgad Encroachment झालेल्या दंगलीला जबाबदार Sambhaji Bhide: Jitendra Awhad

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss