Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Ashadhi Ekadashi 2024:उपवासाची खिचडी तर नेहमी खातो, मग यावेळी करा काहीतरी नवीन…

हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी साजरी केली जाईल. यंदा आषाढी एकादशीची तिथी १७ जुलैला असणार आहे. महाराष्ट्रात विठुरायाचे भक्त आपल्या भक्तीपोटी आषाढी एकादशीला उपवास करतात. महाराष्ट्रातील प्रत्येक जण आषाढी एकादशीला उपवास ठेवून उपवासाचे विविध पदार्थ खातात. काहीजण फक्त फळं खातात आणि दूध पितात. परंतु उपवासाच्या दिवशी घरच्या घरी काही रुचकर उपवासाचे पदार्थ बनवू शकता. उपवासासाठी भगरीचा डोसा कसा बनवायचा याची रेसिपी आपण पाहणार आहोत. उपवासाचा डोसा तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर ही रेसिपी नक्की करून पहा.

भगरीचे डोसे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 

  • भगर (वरईचे तांदूळ)- २ वाट्या
  • साबुदाणा- १ वाटी
  • बटाटे- २ (मध्यम आकाराचे)
  • भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट- १/४ वाटी
  • हिरव्या मिरच्या- ४ ते ५
  • दही- १ वाटी
  • साखर- १ चमचा
  • मीठ- चवीनुसार
  • साजूक तूप- १ छोटी वाटी
  • पाणी गरजेनुसार

कृती: 

  • प्रथम एका भांड्यात साबुदाणे ३ ते ४ तासांसाठी भिजवून घ्यावे. त्यात थोडे पाणी ठेवावे.
  • भगरही स्वच्छ धुवून ती अर्धा तास भिजत घालावी.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजलेली भगर आणि साबुदाणे  टाकून बारीक करून घ्या.
  • त्यानंतर त्यात दही घालून हे मिश्रण पुन्हा एकदा फिरवून घ्या.
  • मिश्रण घट्टसर वाटत असेल त्यात थोडं पाणी घालावे.
  • तयार केलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ आणि साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
  • एका बाजूला गॅसवर डोसा तवा ठेवून त्यावर थोडे साजूक तूप टाकून पसरावे.
  • गरम तव्यावर तयार केलेले डोसा पीठ टाकून पातळ पसरून घ्या.
  • डोसा दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यत खरपूस भाजावा.
  • दुसऱ्या बाजूला डोसा भाजताना थोडे तुपाचे थेंब टाकावे.
  • उपवासाचा डोसा हा चटणीसोबत खायला चविष्ट लागतो.

 

चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य व कृती:

  • भाजलेले शेंगदाणे- १/४ वाटी
  • ओले खोबरे- १/२ वाटी
  • दही- १/२ वाटी
  • हिरव्या मिरच्या- ३ ते ४
  • मीठ चवीनुसार

चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे, ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, दही आणि मीठ टाकून एकत्र वाटून घ्या. तयार केलेल्या चटणीत थोडे पाणी घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या.
एका कढईमध्ये थोडेसे तेल घालून त्यात जिऱ्याची फोडणी द्या. नंतर त्यात तयार केलेले चटणीचे मिश्रण टाकून परतून घ्या. भगरीचे डोसे आणि चटणी खायला अगदी खुसखुशीत आणि चविष्ट लागतात.

 

हे ही वाचा :

Lonavala Bhushi Dam Tragedy: पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमक्या उपाययोजना काय?: Nana Patole

New Criminal Laws Change : देशात आजपासून लागू झाले “हे” नवे कायदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

 

 

 

Latest Posts

Don't Miss