Thursday, July 18, 2024

Latest Posts

ASHADHI EKADASHI : उपवासाची थाळी ! तुम्हाला माहित आहे का ? ; नसेल माहित तर नक्की करून पहा..

परंतु सर्वांनाच काही पंढरपूरच्या वरील जाता येत नाही. मग ते सर्व भक्त हे घरीच छान उपास करतात, भजन- कीर्तन करतात, पांडूरंगाची पूजा अर्चा अगदी भावपूर्णतेने करतात. उपवास करायचा म्हंटल तर मग दरवेळी साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी , राजगिऱ्याचे लाडू आणि वारयीचे तांदूळ खात असतो परंतु यावेळी आपण काहीतरी नाव बनून खाऊ शकतो.

आषाढी एकादशीच फारच भावमय वातावरण आपल्याला अनुभवायला मिळत आहे. त्याशिवाय पंढरपूरची वारी म्हंटल कि अगदीच सर्व वारकरी हे तेजपुंज होऊन आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी फारच उत्सुक असतात. ती वारी म्हंटली कि प्रत्येक जण हा पंढरपूरला एक दिवस तरी जाऊन आलंच पाहिजे असं म्हणतात. परंतु सर्वांनाच काही पंढरपूरच्या वरील जाता येत नाही. मग ते सर्व भक्त हे घरीच छान उपास करतात, भजन- कीर्तन करतात, पांडूरंगाची पूजा अर्चा अगदी भावपूर्णतेने करतात. 

उपवास करायचा म्हंटल तर मग दरवेळी साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी , राजगिऱ्याचे लाडू आणि वारयीचे तांदूळ खात असतो परंतु यावेळी आपण काहीतरी नाव बनून खाऊ शकतो. जेऊ तर नाही शकत मग आपण उपवासाची थाळी ही  नक्कीच खाऊ शकतो. महाराष्ट्राचे आद्यदैवत असलेल्या विठू माऊलीचा मोठा उत्सव आषाढी एकादशीला असतो सबंध महाराष्ट्र या खास दिवसाने भारावलेला असतो असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे वर्षभरात येणाऱ्या २४ एकादशींपैकी इतर कोणतीही एकादशी केली नाही तरी मोठी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीचा उपवास बहुतेक घरामध्ये कुटुंबातले सर्वच सदस्य करतात. अशावेळी या उपवासासाठी खास पदार्थाची संपूर्ण थाळी, पदार्थ कसे असावे याविषयी जाणून घेऊया.

वरईचा भात :
  • वरई सोनरी होईपर्यंत भाजून घ्या. त्यानतर पॅनमध्ये तेल / तूप गरम करून त्यात जीर घाला. बारीक चीरलेला बटाट घाला बटाटा नीट शीजू द्यावा.
  • आवडीनुसार साधारण अर्धा ते एक चमचा मिरची वाटून घाला. कच्चा वास निघून जाईपर्यंत परतवून घ्या. त्यात पाव वाटी शेंगादाण्याचा कुट, मीठ, वरई घाला गरम पाणी टाका आणि झाकण ठेवून शिजवा.
शेंगदाण्याची आमटी :

यासाठी कढईत तेल / तूप गरम करून त्यात जीर घाला. एक चारीक चिरलेली मिरची, एक चमचा लाल तिखट, दोन चमचे शेंगदाणा कुट, नीट परतवून घेतल्यावर त्यात दोन वाट्या ताक, मीठ, साखर घालून उकळी येऊ द्या.

बटाट्याची भाजी :

पॅनमध्ये तेल / तूप गरम करून त्यात जीर घाला, त्यात हिख्या मिरचीची पेस्ट घालून नीट परतवून घ्या. त्यात दोन चमचे शेंगदाणा कुट आणि उकडून मॅश केलेले दोन बटाटे घाला. मीठ घाला आणि नीट मिक्स करून परतून घ्या.

राजगीरा हलवा :

एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात एक चमचा बारीक तुकडे करून ड्रायफ्रूट्‌स घाला. ते नीट परतले की बाजूला काढा अर्धी वाटी राजगीरा पिठ तुपात भाजा. एक वाटी गरम पाणी घालून झाकण लावून वाफ काढून घ्या नंतर त्यात गरम दूध घालून नीट शिजवा. त्यात अर्धीवाटी साखर, एक चमचा तूप घाला. नीट मीक्स केल्यावर त्यात वेलची पूड आणि परतलेले ड्रायफ्रूट्स टाकावेत. 

साबुदाणा भजी :

अर्धीवाटी साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यात बारीक चिरलेला कच्चा बटाटा, एक मिरची, मीठ घाला आणि सोबत थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. ५-१० मिनीट झाकून ठेवा. नंतर नीट मिक्स करून गरम तेलात त्याची भजी तळून घ्या.

उपवासाची पूरी :

३ बटाटे उकडून किसून घ्या पऊण वाटी वरई आणि २-३ चमचे साबुदाणा घालून मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करा. ते पिठ बटाट्यासोबत मिक्स करा. २ चमचे हिरवी मिरची पेस्ट, अर्धा चमाचा तिखट, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. पाणी न घालता कणीक मळा आणि १५ मिनीट तशीच ठेऊन हाताला तेल लावून बटर पेपरवर पुरी थापा ती गरम तेलात नीट तळून घ्या. सोबत थोडे वेफर्स तळून घ्या.

मसाला ताक

एका बाऊलमध्ये अर्धीवाटी दही घाला. नीट फेटून घेत त्यात जीरेपूड, मीठ आणि पाणी घालून नीट फेटून घ्या. अशा प्रकारे तुमची उपवासाची थाळी तयार होईल. आणि तुम्ही तुमच्या उपवासाचा विशेष आनंद घेऊ शकता. खरतर उपवास म्हणजे पोटाला थोडा आराम देऊन शारीरिक स्वास्थ्य उत्तम राखण्यास मदत होते. त्यामुळे ही उपवासाची थाळी कमीप्रमाणात व दिवसातून एकदाच खाऊन घ्यावी. जेणेकरून त्या उपवासाचा आपणाला लाभ होऊ शकेल. 

हे ही वाचा:

ठाणेकरांसाठी खुशखबर ; SHINDE सरकार मध्यरेल्वेवर उभारणार एक नवे RAILWAY STATION..

FUNGAL INFECTION होत आहे.. ; तर करून पहा हे आयुर्वेदिक उपाय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss