beetroot बीट या कंदमुळापासून बनवा टेस्टी हलवा

beetroot बीट या कंदमुळापासून बनवा टेस्टी हलवा

बीटरुटचे ( beetroot ) आरोग्याला अनेक फायदे आहेत. जर तुम्हाला बीट सेवन करायला आवडत नसेल तुम्ही बीटरूट पासून त्याचा ज्यूस बनवून देखील तुम्ही सेवन करू शकता. आता थंडी चालू झाली आहे. थंडीत तर बीटरूटचे सेवन आवर्जून केले पाहिजे. थंडीमध्ये बीटरुटचे सेवन केले की शरीराला अनेक फायदे होतात. तसेच बीटरुट अनेक आजारांच्या समस्यांवर फायदेशीर आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी बीटरूट आणि गाजरचा रस बनवून प्यावा. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून बीटाचा हलवा ही रेसिपी सांगणार आहोत.

बीटाचा हलवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच बीटामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट घटक असतात जे त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो. व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आढळून येते जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पण याचे नियमितपणे सेवन केले पाहिजे. तुम्हाला गाजराचा हलवा माहितच असेल पण तुम्हाला बीटाचा हलवा माहित आहे का ? जाणून घ्या मग रेसिपी.

 

साहित्य :

४ बीट
१ कप दूध
१ कप तूप
३/४ कप साखर
गरजेनुसार हिरवी वेल
गरजेनुसार काजू

कृती :

सर्व प्रथम एका भांडयात तूप चांगले गरम करून घ्या, तूप चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू घालून घ्या. काजू घातल्यानंतर त्यामध्ये बारीक किसलेला बीट घालून घ्या. आणि मिश्रण चांगले शिजवून घ्या. वरून थोडेसे तूप घालून घ्या आणि परत एकदा चांगले ढवळून घ्या. हलवा चांगला शिजल्यानंतर त्यामध्ये दूध घालून घ्या आणि १५ मिनिटे परत एकदा शिजवून घ्या. बीटाचा (beetroot) हलवा चांगला मऊ झाला की त्यामध्ये साखर घालून घ्या. आणि साखर चांगली वितळेस पर्यंत हलवा शिजून घ्या. शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये वरून वेलीची पूड घालून घ्या. आणि गरमागरम बीटाचा हलवा खाण्यासाठी तयार आहे. तसेच तुम्ही बीटाचा हलवा सणासुदी मध्ये देखील बनवू शकता.

हे ही वाचा : 

महिलांसाठी उपयोगी असलेले काही खास योगासने

 

 

Exit mobile version