spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कच्च्या लसणाचे फायदे आणि नुकसान

लसूण फार आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लसूणमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहे. ते अनेक आजारांपासून आपल्याला दूर ठेवते. लसणाचा वापर लोक भाजीमध्ये करतात. लसणाचे पाणी पिल्याने आरोग्य निरोगी राहते. काहीजणांना लसणाचे फायदे माहित नाही. लसणामध्ये अँटी बॅक्टरील आणि अँटी वायरल असे गुण असतात. लसणामध्ये अँटी ऑक्सिडेन्ट जास्त प्रमाणत असते. तसेच लसूणमध्ये व्हिटॅमिन बी -१ , व्हिटॅमिन – सी हे पोषक तत्वे असतात. तसेच यामध्ये कॅल्शिम आणि आयर्नही देखील भरपूर प्रमाणात असते. तर चला आज जाणून घेऊया लसूण बदल.

हे ही वाचा : गुणकारी मुळ्याचे आरोग्यासाठी फायदे

 

लसणाचे फायदे –

लसणामध्ये असणार्‍या घटकांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लसणाचे सेवन करणार्‍या व्यक्तीला सर्दी-ताप कमी वेळा येतो.

लसणातील औषधी घटक हे शरीरातील ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतात.

लसूण खाल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

रोज लसूण खाल्याने इंसुलियनची पातळी सुधारते आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.

शरीरातील रक्ताची कमतरता असल्यामुळे लसूण खूप फायदेशीर ठरतो. लसणात लोह असते. रक्त तयार होण्यास लोह आवश्यक असते.

दररोज १ – २ लसूणच्या पाकळ्या खाल्याने आरोग्यास खूप फायदे होतील. तसेच तुम्ही लसणाच्या पाकळ्यापासून रस देखील बनू शकता. आणि त्याचे देखील तुम्ही सेवन करू शकतात.

 

लसणाचे तोटे –

जास्त प्रमाणात लसूण खाल्याने तुम्हाला हृदयासाठी घातक ठरू शकते.

काहीजण लसणाची पेस्ट त्वचेवर लावतात त्यामुळे त्वचेवर जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो.

मधुमेहाच्या रुग्णांनी लसूण खाताना थोडी काळजी घ्यावी. लसूण खाल्याने रक्तातील साखर कमी होते. मधुमेहाच्या रुग्णांनी डॉकटरच्या सल्याशिवाय लसूण खाऊ नये.

लसुण गरम असल्यामुळे गरोदरपणात लसूण खाऊ नये.

जर तुम्हाला पोटाच्या देखील काही समस्या असतील तर लसूण खाऊ नये.

लसूण खाल्याने उलटी होणे, छातीत जळजळ होणे , तोंडाची दुर्गंधी येणे असे देखील होऊ शकते.

हे ही वाचा :

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची हायकोर्टात धाव

 

Latest Posts

Don't Miss