किविचा ज्यूस पिण्याचे फायदे

किविचा ज्यूस पिण्याचे फायदे

आरोग्यासाठी किवीचा ज्यूस पिणे खूप फायदेशीर ठरू शकतो. किवीमध्ये खूप आरोग्यदायी फायदे असतात. तसेच किवीचा रस त्वचेसाठी देखील खूप उत्तम आहे. किवीचा रसाचे सेवन केल्याने शरीरातील पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत होते. तर आज आम्ही तुम्हाला किवीच्या रसाचे फायदे सांगणार आहोत.

हे ही वाचा : खजूर खाल्याने आरोग्याच्या तक्रारी राहतील दूर…

 

तसेच किवीचा रसामध्ये कार्बोहायड्रेट, फॉस्फरस, पोटॅशियम, तांबे, व्हिटॅमिन सी, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फोलेट आणि बीटा कॅरोटीन असे पोषक घटक असतात. किवीचा रस पिल्याने शरीराला व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात मिळते. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी किवीचा रसाचे सेवन करणे.

नियमितपणे किवीचा रस सेवन केल्याने हृदय विकाराचा धोका काम होतो. किवीमधील पोटॅशियम हृदय आणि रक्तसंबधीच्या आजरांना दूर ठेवते. रोज १ ग्लास तरी तुम्ही किवीच्या रसाचे सेवन करा.

किवीच्या रसाचे सेवन केल्याने त्वचेचे आरोग्य आणि केसांचे आरोग्य चांगले राहते. किवीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी रोज १ ग्लास तरी किवीची रस पिणे.

 

किवीचा रस पिल्याने पचनक्रिया सुधारते. पोटाचे विकार देखील कमी होतात. किवीचा रस तुमचा शरीरात प्रोबायोटिक म्हणून काम करतो. व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

जर तुम्हाला डेंग्यू झाला असेल तर तुम्ही किवीचे सेवन करा. कारण डेंग्यू झाल्याने शरीरातील पांढऱ्या पेश्या कमी होतात आणि आपल्यात अशक्तपणा जाणवतो. जर तुम्हाला तुमच्या शरीरातील पांढऱ्या पेशी वाढवण्याचा असतील तर तुम्ही किवीचा किंवा किवीच्या रसाचे सेवन करणे. तसेच किवीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स आढळतात.

हे ही वाचा :

जाणून घ्या ओट्स खाण्याचे फायदे…

 

Exit mobile version