सफरचंद खाण्याचे फायदे

सफरचंद खाण्याचे फायदे

सकाळी सकाळी एक सफरचंद ( Apple ) खाल्यानी आरोग्यावर चांगले परिणाम होतात . रोज फळे खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते फळे खाण्याने मानसिक आणि शारीरिक असे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. सफरचंदाचे सेवन हे फळांमध्ये सर्वाधिक फायदेशीर मानले जाते. फळामध्ये जास्त प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि रोगांशी लढणारे घटक असतात. An Apple A DAY Keep The Doctor Away. असे इंग्रजीमधले म्हण आहे .

हे ही वाचा : ग्रीन टी च्या फायद्यांविषयी घ्या जाणून

 

सफरचंदाचे नियमित सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.

सफरचंद खाल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो .

बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या रुग्णांसाठी सफरचंदाचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

सफरचंद फळ खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो आणि त्वचाही चमकते. त्यामुळे स्नॅक्स किंवा ब्रेकफास्टमध्ये सफरचंदाचा समावेश करणे .

सफरचंदात आढळणारे मॅलिक ऍसिड पचनास मदत करते.

सफरचंद खाल्ल्याने किडनी स्टोन तयार होत नाहीत. त्यामुळे सफरचंद खाणे अतिशय चांगले.

 

पचना दरम्यान, तुमचे लहान आतडे फायबर शोषत नाही, तर ते कोलनमध्ये जाते. येथून चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होते, ज्यामुळे पचनास मदत होते.

सफरचंदातील फायबर तुमचे दात मजबूत ठेवण्यास मदत करते .

आपण सफरचंद कधीही खाऊ शकतो. सकाळी सफरचंद खाल्ल्यास त्याचा अधिक फायदा होतो. याचं कारण म्हणजे सफरचंदात फायबर आणि पेक्टिन जास्त प्रमाणात असते .

सफरचंदाचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात . आणि हाडांचे आरोग्य सुधारते .

सफरचंदाचे सेवन केल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होतात .

सफरचंदाचा रस केसांच्या मुळांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो .

जर तुम्ही दिवसातून २-३ वेळा सफरचंद खाले की तुमच्या रक्ताची वाढीची समस्या दूर होते . आणि रक्त वाढीस मदत होते .

सफरचंदामधील क्वेरसेटिन हा घटक आपल्या शरीरातील पेशींना इजा होण्यापासून वाचवतो. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

हे ही वाचा :

छोल्यांपासून बनवा चविष्ट मसाले पकोडे

 

Exit mobile version