स्ट्रॉबेरी खाण्याचे फायदे

स्ट्रॉबेरी खाण्याचे फायदे

हिवाळ्यात बरीच फळे बाजारात विक्री साठी येतात. आणि या फळांमध्ये बरेच गुणधर्म असतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. स्ट्रॉबेरी हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असते आणि डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात ही गोड फळे आपल्यापर्यंत पोहोचतात. जर आपण हिवाळ्याच्या काळात आपण आपल्या आहारात स्ट्रॉबेरीचा समावेश केला तर ते आपल्या शरीरातील अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण करू शकते. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने तुमच्या शरीराला बरेच फायदे मिळतात. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते.

हे ही वाचा : साबुदाणा खरेदी करताय… ? मग या बाबी नक्की लक्षात घ्या

 

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन्ससोबत भरपूर खनिजे आणि मिनरल्स देखील असतात. ते शरीरातील ज्या भागामध्ये त्रास होत असेल, तर तो त्रास कमी करण्याचा प्रयत्न होतो.

नाष्ट्याच्या वेळेस स्ट्रॉबेरीचे सलाड खाऊ शकतो.

फळातील सुगंध, गडद लाल रंग, रसयुक्त आणि त्याच्या गोडीकरता प्रसिध्द आहे. याचा उपयोग ज्युस, आईसक्रीम, मिल्कशेक, चाॅकलेट बनवण्याकरीत आणि खाण्याकरता देखील केला जातो.

या फळा मध्ये पोटॅशियम मॅग्नीशियम आणि व्हिटामीन के असतात आणि आपले हाडे मजबूत करण्यास मदत होते. जे आपल्या आरोग्याकरता खुप आवश्यक आहे.

पोटॅशियम, आणि मॅग्नेशियम उच्चरक्तदाबाच्या समस्येला दूर करतात आणि हे स्ट्राॅबेरी मध्ये आढळतात.

स्ट्रॉबेरीची चव आंबट गोड असते आणि लहानांपासून ते अगदी मोठयापर्यंत आवडते.

 

दातांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी स्ट्रॉबेरीचे सेवन करा. यामुळे दात आणि हिरड्यांची ताकद वाढू शकते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी दातांचा पिवळेपणा दूर करते.

स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे तुमचे वाढते वजन कमी होऊ शकते. यासोबतच हा फायबरचे प्रमाण जास्त असते.

स्ट्रॉबेरी मध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स आढळतात. आणि त्वचेचा रंग उजळण्यासाठी मदत होते.

त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरीचा फायदा होतो.

तसेच स्ट्रॉबेरी त्वचेवरील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते आणि पिंपल्स देखील कमी करते.

हे ही वाचा :

आरोग्यासाठी गाजर खाण्याचे फायदे

 

Exit mobile version