मूग डाळ आहारात असल्याचे फायदे, जाणून घ्या…

मूग डाळ आहारात असल्याचे फायदे, जाणून घ्या…

नियमित पणे मूग डाळीचे सेवन केल्याने आरोग्याला खूप फायदे होतात. तसेच ही डाळ चवीला देखील चांगली असते. मुगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. त्याच बरोबर मूग डाळीमध्ये पॉटेशियम, व्हिटॅमिन्स, झिंक, कॉपर असे पोषक तत्वे असतात. डाळी सोबतच डाळीचे पाणी सेवन केल्याने अनेक फायदे होतात. मूग डाळीचे सेवन केल्याने डेंग्यू सारख्या आजरापासून दूर ठेवते. तसेच मूग डाळीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळून येतात. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून मूग डाळ खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

मूग डाळमध्ये असलेले फायबर पोट निरोगी ठेवते. त्यात असलेले कार्ब इतर गोष्टींपेक्षा अधिक निरोगी आहे, जे पोट डिटॉक्सिफाइंग आणि साफ करण्यास मदत करते.

मूग डाळीचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. आणि आरोग्य देखील सुधारते.

मूग डाळ रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. त्यात असलेले पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

 

मूग डाळ भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते. भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूग डाळ नियमित पणे खाणे. तसेच मूग डाळ खाल्ल्याने रक्तदाबाचा त्रासही होत नाही. त्यामुळे रक्तातील मॅग्नेशियमचा प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

मूगडाळीमध्ये कॉपर मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते. मूगडाळीमुळे मेंदूमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते. केसांना समूळ मजबुतपणा येण्यास मदत होते.

मूग डाळ आणि मूगडाळीच्या पाणीचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. यामुळे शरीर आतून स्वच्छ होते. तसेच लिव्हर, रक्त या सारख्या आतडयांची देखील स्वच्छता करते.

मूग डाळीचे सेवन केल्याने लहान मुलांना देखील खूप फायदा होता. लहान मुलांना मूग डाळीचे पाणी पटकन पचते. यामुळे रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. म्हणून नियमित पणे मूग डाळीचे सेवन करणे. मूग डाळीचे सेवन आवर्जून करा.

हे ही वाचा :

थंडीच्या दिवसात मुलांना द्या ‘हे’ पदार्थ….

 

Exit mobile version