Vitamin C ने उपयुक्त असलेले हिरवेगार आणि लाल बुंद कलिगंड खाण्याचे फायदे

Vitamin C ने उपयुक्त असलेले हिरवेगार आणि लाल बुंद कलिगंड खाण्याचे फायदे

Benefits Of Watermelon : हिवाळा हा ऋतू आता सुरु झाला आहे. हिवाळयात कलिंगड खाण्याचे फायदे तुम्हाला माहित का ? खरतर कलिंगड हे फळ उन्हाळ्यात खाल्ले जाते. कारण उन्हाळ्यात या फळाचे सेवन केल्याने शरीराला आतून थंडावा मिळतो. म्हणून उन्हाळ्यात या फळाचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून हिवाळयात कलिंगड खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

हिरवागार आणि लाल रंगाचा कलिंगड सर्वांना खायाला आवडतो. हिवाळयात कलिगंड सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. उन्हाळ्यात कलिंगडाचे जास्त पीक घेतले जाते, पण आजकाल सर्वीच फळ प्रत्येक ऋतू मध्ये पाहायला मिळतात. तसेच कलिंगड मध्ये भरपूर प्रमाणात अनेक प्रकारचे पोषक तत्वे देखील आढळून येतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

 

कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स (Antioxidants) ,व्हिटॅमिन्स बी (Vitamins B) , व्हिटॅमिन सी (Vitamin C) , व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात आढळून येतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. ही पोषक तत्वे शरीरासाठी खूप महत्वाची असते. जर तुम्ही थंडीत कलिंगडाचे सेवन केले तर शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होईल. कलिंगड नियमीतपणे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयाचा संभंधित आजरांचा धोका कमी होतो.

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड या फळाचे सेवन आवर्जून करणे. कलिंगडाचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते त्याच बरोबर पाणी देखील मिळते. म्हणून कलिंगड सेवन करावे.

बद्धकोष्ठते मुळे बहुतेक लोक त्रस्त आहे. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा किंवा गॅसचा त्रास असेल तर तुम्ही नियमितपणे कलिंगडाचे सेवन करणे. यामुळे बद्धकोष्ठतेचा आणि गॅसचा त्रास होणार नाही आणि पचनक्रिया देखील सुधारेल.

कलिंगड खाण्याआधी स्वच्छ धुवून घेणे, ते कितीही स्वच्छ असले तरी कलिंगड धुवून घेणे. कलिंगड कापल्यानंतर लगेच खाऊन घ्यावे जास्त वेळ ठरून नये. कारण जास्त वेळ ठेवल्याने शरीरावर त्याचे हानिकारक परिणाम होण्याची शक्यता असू असू शकते.

 

हे ही वाचा :

छोल्यांपासून बनवा चविष्ट मसाले पकोडे

 

 

Exit mobile version