spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कारल्याची फक्त भाजीच नाही तर करून बघा कुरकुरीत भजी…

कारल्याच्या सेवनामुळे शरीराच्या विविध प्रणालींचे कार्य सुधारते आणि एकूणच आरोग्याला चालना मिळते. आपल्या आहारात कारल्याचा समावेश केल्याने शरीरातील अनेक रोगांचे निर्मूलन करता येते. कारले फक्त भाजी किंवा रसाच्या स्वरूपातच नाही, तर औषधी गुणधर्मांमुळेही अत्यंत महत्त्वाचे आहे.

सर्वांचे न आवडते असणारे कारले हे तुपात तळले किंवा साखरेत घोळवले तरी ते कडूच राहणार अशी कारल्याची म्हण आपल्याकडे लोकप्रिय आहे. आपल्याकडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच कारले म्हटले की नाकं मुरडतात. त्यात ते चवीला अतिशय कडू असल्याने बऱ्याच लोकांना ते आवडत नाही. कारले चवीला कडू असले तरी ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारले हे भारतीय आहारातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. पारंपारिक आयुर्वेदिक उपचारांमध्ये कारल्याला विशेष स्थान दिले जाते. कारल्याच्या सेवनामुळे शरीराच्या विविध प्रणालींचे कार्य सुधारते आणि एकूणच आरोग्याला चालना मिळते. आपल्या आहारात कारल्याचा समावेश केल्याने शरीरातील अनेक रोगांचे निर्मूलन करता येते. कारले फक्त भाजी किंवा रसाच्या स्वरूपातच नाही, तर औषधी गुणधर्मांमुळेही अत्यंत महत्त्वाचे आहे. कारल्याची फक्त भाजीच नाही तर त्याची कुरकुरीत भजीदेखील करू शकतो. कारल्याची भजी कशी करायची याची सोपी रेसिपी आपण पाहुयात. त्याचबरोबर कारल्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे काय आहेत हे थोडक्यात बघूया.

साहित्य:

  • कारले – २ मोठी
  • बेसन पीठ – १ कप
  • तांदळाचे पीठ – २ टेबलस्पून
  • कॉर्नफ्लॉवर – १ टीस्पून
  • हळद – १/२ टीस्पून
  • तिखट – १ टीस्पून
  • जिरे – १/२ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • हिंग – १ चिमूट
  • ओवा – १/२ टीस्पून
  • कोथिंबीर – २ टेबलस्पून (बारीक चिरून)
  • तेल – तळण्यासाठी

कृती:

  • कारले स्वच्छ धुऊन त्याचे पातळ काप करून घ्या.
  • एका भांड्यात बेसन पीठ, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लॉवर, हळद, तिखट, जिरे, मीठ, हिंग, ओवा आणि कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्या.
  • हळूहळू पाणी घालून पीठ गाठी नसलेले, जाडसर पेस्ट बनवून घ्या.
  • एका कढईत तेल गरम करा.
  • कारल्याचे काप पीठाच्या मिश्रणात बुडवून गरम तेलात तळा.
  • भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • गरमागरम कारल्याची भजी चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.
हे ही वाचा:

दहीहंडीच्या मंचावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत मनसे नेते दिसले, चर्चांना आले उधाण

Exclusive : Sindhudurg विमानतळ फ्लॉप प्रोजेक्टच्या प्रश्नावर Nilesh Rane यांचा गौप्यस्फोट

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss