चहाची सवय काही केल्या सुटत नाही? तर अशी मोडा सवय

हिवाळा असो व उन्हाळा आपल्या रोजच्या जीवनात चहा कधी चुकत नाही. 'वेळेला चहा असतो, पण चहाला वेळ नसते' असे म्हटले जाते. थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता मिळावी म्हणून आपण सतत चहाचे सेवन करतो. गरम चहा घेतल्याशिवाय काही लोकांच्या दिवसाची सुरवात सुद्धा होत नाही.

चहाची सवय काही केल्या सुटत नाही? तर अशी मोडा सवय

हिवाळा असो व उन्हाळा आपल्या रोजच्या जीवनात चहा कधी चुकत नाही. ‘वेळेला चहा असतो, पण चहाला वेळ नसते’ असे म्हटले जाते. थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता मिळावी म्हणून आपण सतत चहाचे सेवन करतो. गरम चहा घेतल्याशिवाय काही लोकांच्या दिवसाची सुरवात सुद्धा होत नाही. भारतात सर्वाधिक लोक चहासाठी वेडे आहेत. भारतीय संस्कृतीत चहा हे अमृत समजले जाते. मोठा सोहळा असो, लग्न घर असो, चहा हे पेय सगळीकडे असते. भारत देशात चहाला मोठी मागणी आहे. बराच वेळ ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना ही सतत चहा पिण्याची सवय असते. सतत एसीमध्ये राहून शरीर थंड पडते म्हणून शरीराला उष्णता देण्यासाठी सतत चहा पिण्याची सवय लागली जाते. चहा हा दिवसभरात एक किंवा दोन कप घेणे हे साधारणपणे योग्य असते. जास्त प्रमाणात घेतलेल्या चहाचे सेवन आरोग्यावर हानिकारक असते.

चहाला पर्याय शोधा :

चहा शरीराला त्रास देत असल्यास, चहाला वेगळा पर्याय शोधा. चहाची सवय कमी करा. रोज ५ कप चहा घेत असाल तर, हळू हळू एक कप कमी करा. चहाला आयुर्वेदिक पर्याय शोधा जसे की हेल्थी ड्रिंक (healthy drink), ग्रीन टी (green tea ), हर्बल टी (harbal tea), दूध (milk) या गोष्टींच्या सेवनाने चहाची सवय सुटते व आरोग्यावरही चांगले परिणाम दिसून येतात.

पुरेपूर झोप :

आपण रात्री उशिरा झोपतो किंवा काही जणांना रात्री उशिरा झोपायची सवय असते. सकाळी त्यांचा पूर्ण दिवस हा आळसात जातो. हा आळस घालवण्यासाठी लोक चहा घेऊ लागतात. कामाची गती वाढवण्यासाठी सारखे चहा घेतात त्यामुळे आपल्या शरीराला हानी पोहचू शकते. याउलट पुरेशी झोप घेतल्याने आपले शरीर ताजेतवाने राहते, आपल्याला उत्साहित ठेवण्यासाठी कोणत्याही बाहेरील गोष्टींची गरज लागत नाही.

सकस आहार घ्या :

रोजच्या जीवनात संतुलित आहार (balance diet) घ्या. संतुलित आहार घेणे आपल्या शरीराला योग्य असते. चांगला आहार शरीराला चांगले पोषक घटक पुरवतात. चांगला आहार घेतल्याने शरीरात ऊर्जा कायम राहते. त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी बाहेरील कोणतेही पदार्थ खाण्याची गरज भासत नाही.

हे ही वाचा:

घामाचा दाम मिळणार ! एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून ३०० कोटींचा निधी मंजूर

राज्यातील MPSC विद्यार्थ्यांचे राज्यभर आंदोलन, काय आहेत मागण्या?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version